इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख ढकलली पुढे

The government extended the deadline till December 31 for filing of Income Tax returns from September 30, 2021.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) ९ सप्टेंबर रोजी आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी इन्कमटॅक्स रिटर्न भरण्याची मुदत पुन्हा वाढवली आहे. आयटीआर भरण्याची अंतिम मुदत दुसऱ्यांदा ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आली. पूर्वी ती जुलै ते सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.

केंद्रीय वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे, “२०२१-२२ साठी उत्पन्न परतावा सादर करण्याची तारीख जी कायद्याच्या कलम १३९ च्या उप-कलम (१) अंतर्गत ३१ जुलै, २०२१ होती ती दिनांक २०.०५.२०२१ च्या परिपत्रक क्र.९/२०२१ नुसार ३१ डिसेंबर, २०२१ पर्यंत आणखी वाढविण्यात आली आहे.

आयकर रिटर्न भरताना करदात्यांनी आणि इतर स्टेकहोल्डरनी नोंदवलेल्या अडचणी आणि आयकर अधिनियम १९६१ (“कायदा”) अंतर्गत वर्ष २०२१-२२ साठी ऑडिटवर आलेले विविध अहवाल यामुळे केंद्रीय प्रत्यक्ष मंडळाने मुदत वाढवली आहे.

संबंधीत तपशील खालीलप्रमाणे आहेत

२०२१-२२ साठी इन्कम टॅक्स देण्याची अंतिम तारीख जी ३१ जुलै २०२१ होती अधिनियम कलम १३९ च्या उप-कलम (१) अंतर्गत ती ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढवली होती आता परिपत्रक क्र. ९/२०२१ दिनांक २०.०५.२०२१ याद्वारे हीच तारीख ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत आणखी वाढविण्यात आली आहे.

२०२०-२१ साठी अधिनियमाच्या तरतुदी अंतर्गत ऑडिटचा अहवाल सादर करण्याची अंतिम तारीख जी ३० सप्टेंबर २०२१ होती ती ३० ऑक्टोबर २०२१ पर्यंत वाढवली गेली होती. आता परिपत्रक क्र .९/२०२१ दिनांक २०.०५.२०२१ द्वारे १५ जानेवारी २०२२ पर्यंत आणखी वाढविण्यात आली आहे.

वर्ष २०२०-२१ साठी कायद्याच्या कलम 92E अंतर्गत आंतरराष्ट्रीय ट्रांसॅक्शन किंवा घरगुती ट्रांसॅक्शन करणाऱ्या व्यक्तींना अकाउटंट कडून अहवाल सादर करण्याची अंतिम तारीख जी ३१ ऑक्टोबर २०२१ होती ती ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढवली गेली होती. जी परिपत्रक क्र. ९/२०२१ दिनांक २०.०५.२०२१ याद्वारे ३१ जानेवारी २०२२ पर्यंत पुढे वाढविण्यात आली आहे.

२०२१-२२ साठी इन्कम रिटर्न देण्याची अंतिम तारीख जी अधिनियम कलम १३९ च्या उप-कलम (१) अंतर्गत ३१ ऑक्टोबर २०२१ होती ती ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढवली गेली होती जी परिपत्रक क्रमांक ९/२०२१ दिनांक २०.०५.२०२१ याद्वारे १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

२०२१-२२ साठी इन्कम टॅक्स रिटर्न देण्याची अंतिम तारीख जी ३० नोव्हेंबर २०२१ होती अधिनियम कलम १३९ च्या उप-कलम (१) अंतर्गत ३१ डिसेंबर २०२१ वाढवली होती. आता ती परिपत्रक क्र. ९/२०२१ दिनांक २०.०५.२०२१, याद्वारे ती आणखी २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

२०२१-२२ साठी विलंबित/सुधारित इन्कम टॅक्स रिटर्न देण्याची अंतिम तारीख जी ३१ डिसेंबर २०२१ होती. जी अधिनियमाच्या कलम १३९ च्या उप-कलम (४)/उप-कलम (५) अंतर्गत विस्तारित केल्याप्रमाणे ३१ जानेवारी २०२२ करण्यात आली होती. आता परिपत्रक क्र .९/२०२१ दिनांक २०.०५.२०२१, याद्वारे ती ३१ मार्च, २०२२ पर्यंत पुढे वाढविण्यात आली आहे.

दिनांक २०.०५.२०२१ च्या परिपत्रक क्र .९/२०२१ च्या खंड (९), (१२) आणि (१३) मध्ये नमूद केलेल्या तारखांचा विस्तार कलम (१), (४) आणि (५) मध्ये लागू होणार नाही.

भारतातील एखाद्या रहिवाश्याच्या बाबतीत जर अधिनियमाच्या कलम २०७ च्या उप-कलम (२) मध्ये नमूद केले असेल, तर त्याने कायद्याच्या कलम १४० A अंतर्गत ग्राह्य तारखेच्या आत (परिपत्रक क्र. ९/ २०२१ दिनांक २०.०५.२०२१) प्रमाणे कर भरावा.

Comments are closed.