इंस्टाग्राम आणतेय ‘ हे ‘ नविन फिचर, वाचा सविस्तर

The Facebook-owned platform has announced a bunch of new features

नुकत्याच आलेल्या नवीन अपडेटनुसार इंस्टाग्राम डेस्कटॉपवर पोस्ट तयार करण्यासाठी अलो करेल. कंपनीने काही महिन्यांपूर्वी सदर फिचरची चाचणी केली होती, पण आता सदर प्लॅटफॉर्मने सांगितले की, युजर्स 21 ऑक्टोबरपासून वेबवरून पोस्ट करू शकतील.

दरम्यान इंस्टाग्राम लवकरच एक नवीन फिचर सादर करेल,जे युजरला पोस्ट आणि रीलवर कोलॅबरेट करण्याची परमिशन देईल.

“कोलॅब” फिचर्सचा वापर करून, क्रिएटर्स इन्स्टाग्रामवरील टॅगिंग मेनूमधून पोस्टवर कोलॅब करण्यासाठी इतर अकाउंटना आमंत्रित करू शकतात. जेव्हा दुसरी व्यक्ती ते स्वीकारेल, तेव्हा दोन्ही अकाउंट व्ह्यू, लाईक्स आणि कमेंट्स सामायिक करतील. यामुळे पोस्ट किंवा रील दोन्ही अकाउंटवर दिसतील.

कंपनीचे म्हणणे आहे की सध्या हे फिचर आम्ही टेस्ट करत आहोत. फक्त काही अकाउंट्समध्ये या फिचरचा सध्या समावेश आहे.

इन्स्टाग्राम देखील फंड गोळा करण्याच्या नवीन पद्धतीची चाचणी करत आहे. भविष्यात ते “+” बटण वापरून निधी गोळा करणे सुरू करू शकतात. नवीन पोस्ट, स्टोरी, रील आणि लाईव्हच्या पुढे, वापरकर्त्यांना निधी उभारणीचा पर्याय देखील दिसेल, जो होम फीडमध्ये जोडला जाईल.

Comments are closed.