चलो लेह, लडाख… IRCTC चा धमाकेदार टूर प्लॅन

The Leh Ladakh tour by the IRCTC will start on September 26 and end on October 3. The tour will be for eight days and seven nights.

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) उत्तर प्रदेशातील लोकांसाठी लेह-लडाख हॉलिडे पॅकेज उपलब्ध केले आहे.

आयआरसीटीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मदतीने मिळालेल्या माहितीनूसार, लेह-लडाख पॅकेजद्वारे उत्तर प्रदेशातील लोकांसाठी लडाख हॉलीडेचे नियोजन केले जाणार आहे.

ऑफिसियल म्हणाले,”आयआरसीटीसीने वाढत्या मागणीमुळे लेह लडाख पॅकेज उपलब्ध केले आहे. लेह लडाख स्पेशल टूर पॅकेजमध्ये ट्रेन आणि हवाई प्रवास या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे”.

इच्छुक लोक IRCTC पर्यटन वेबसाइट www.irctctourism.com ला भेट देऊन आपली जागा बुक करू शकतात . लेह लडाख टूर पॅकेजची किंमत एका जोडप्यासाठी प्रति व्यक्ती 38,600 रुपये आणि एकत्र प्रवास करणाऱ्या तीन लोकांसाठी प्रत्येकी 37,700 रुपये आहे.

आयआरसीटीसी 26 सप्टेंबरला लेह लडाख टूर सुरू करेल आणि 3 ऑक्टोबरला संपेल. ही टूर आठ दिवस आणि सात रात्रीची असेल.

आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले, “लेह लडाख टूर लखनौपासून सुरू होईल. पहिल्या दिवशी प्रवासी दिल्लीस हवाई मार्गाने किंवा तेजस एक्सप्रेसने प्रवास करतील. पॅकेजमध्ये नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यासह थ्री-स्टार हॉटेलमध्ये राहणे समाविष्ट आहे.

“लेह लडाखमध्ये सर्व पर्यटकांना तेथील सर्व लोकप्रिय ठिकाणी नेले जाईल. पर्यटन स्थळांमध्ये बौद्ध स्तूप, मठ दर्शन, लेह पॅलेस, शांती स्तूप, गुरुद्वारा यांचा समावेश आहे.”

आयआरसीटीसीने नुब्रा व्हॅली येथे एका शिबिराची व्यवस्था केली आहे. पर्यटकांना लेह लडाखमधील डिस्कीट, हंडर आणि तुर्तुक गावातही नेले जाईल.

Comments are closed.