महिंद्रा XUV 700 ची विक्री जोमात, विकल्या ‘ इतक्या ‘ गाड्या फक्त 14 दिवसात

Mahindra XUV700 bookings hit 65,000 in two weeks

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने दावा केला की, लॉन्च झाल्यापासून दोन आठवड्यांत XUV700 साठी एकूण 65,000 बुकिंग झाल्या आहेत.

वाहनाची वितरण प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी तसेच अल्गोरिदम आधारित प्रक्रिया तयार करण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कंपनीने सल्लागार कंपनीशी पार्टनरशीप केली आहे.

वितरण हे पॅरामीटर्स वर आधारित असेल, ज्यात शहर आणि डीलर स्तरावर बुकिंगचे प्रमाण, डीलर काउंटरवर ऑनलाइन आणि ऑफलाईन बुकिंगचे प्रमाण याचा यात समावेश असेल.

XUV700 च्या पेट्रोल व्हेरिएंटची डिलिव्हरी 30 ऑक्टोबरपासून सुरू होईल, तर डिझेल व्हेरिएंटची डिलिव्हरी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होईल, अशी माहिती कंपनीने दिली.

डिलिव्हरी टाइमलाइन 27 ऑक्टोबरपासून ग्राहकांना त्यांच्या संबंधित डीलरशिपद्वारे कळवली जाईल. तथापि, कंपनीने जाहीर केले की दिलेल्या तारखा बदलू शकतात.

कंपनीचा दावा आहे की, फ्लॅगशिप मॉडेलचे सलग दोन दिवस, 7 ऑक्टोबर आणि 8 ऑक्टोबर रोजी पूर्ण बुकिंग झाले, प्रत्येक दिवशी फक्त तीन तासांच्या आत 25,000 बुकिंग झाल्या.

XUV700 मॅन्युअलसाठी 11.99 लाख रुपये आणि ऑटोमॅटिकसाठी 12.99 लाख रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आली. या किंमती केवळ पहिल्या 25,000 युनिट्ससाठी वैध होत्या. त्यानंतर M&M ने XUV700 ची किंमत पुढील 25,000 युनिट्ससाठी 50,000 रुपयांनी वाढवली आहे.

Comments are closed.