सेमीकंडक्टर चिपची कमतरता ऑटो कंपन्यांच्या मानगुटीवरील भूत,कंपन्या लढवताय ‘अशी’ शक्कल

उपाय म्हणून ऑटो कंपन्यानी प्रति वाहन चिपचा वापर कमी करणे किंवा कमी प्रमाणत चिप फिचर्सची कार ऑफर करणे यासारखे उपाय केले आहेत.

सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे अडचणीत आलेल्या ऑटो कंपन्या सध्या अडचणीत सापडलेल्या आहेत. यावर उपाय म्हणून बऱ्याच कंपन्या नविन पर्यायाचा विचार करत आहे.

यासाठी उपाय म्हणून ऑटो कंपन्यानी प्रति वाहन चिपचा वापर कमी करणे किंवा कमी प्रमाणत चिप फिचर्सची कार ऑफर करणे यासारखे उपाय केले आहेत.

टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) ने वाहन पुरवठा साखळी सुधारण्यासाठी आणि वेटींग पिरियड कमी करण्यासाठी असे उपाय केले आहेत. या दोन्ही कंपन्याकडे सध्या 30000 पेक्षा जास्त प्रलंबित ऑर्डरवर असल्याचा अंदाज आहे.

टाटाचा ऑप्टिमाइज चिपचा वापर 

भारतातील तिसरी सर्वात मोठी कार निर्माता कंपनी टाटा मोटर्सने प्रति वाहन वापरल्या जाणार्‍या चिप्सची संख्या कमी केली आहे. कंपनीने वाहनाला शक्ती प्रदान करणाऱ्या एका विशिष्ट कंपोनेंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिप्सची संख्या निम्मी केली आहे. टाटा मोटर्सच्या अधिकार्‍यांनी वाहनाचे मॉडेल सांगितले नाही, परंतु त्यांनी सांगितले की कंपनी पुरवठा साखळी संकटावर मात करण्यासाठी चिप्सच्या ऑप्टिमायझेशनवर काम करत आहे.

पोस्ट-अर्निंग कॉन्फरन्स कॉलमध्ये, टाटा मोटर्सचे अध्यक्ष,शैलेश चंद्र म्हणाले, “एका कंपोनेंटमध्ये आम्ही वापरत असलेल्या सेमीकंडक्टर्सची संख्या निम्म्यावर आणण्यात यशस्वी झालो. आम्ही ऍप्लिकेशन स्पेसिफिक चिप्सचे स्टँडर्ड चिप्समध्ये रूपांतर करण्याचा विचार करत आहोत आणि आम्ही चिप्सच्या ऑप्टिमायझेशनसाठी देखील विचार करत आहोत.

इंधनावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांना अधिक चिप्स लागतात. यासाठी टाटा मोटर्स आतापासूनच तयारी करत आहे.

टाटा मोटर्सला मारुती सुझुकी , ह्युंदाई आणि M&M च्या तुलनेत सेमीकंडक्टरचा कमी तुटवडा जाणवला. सदर कंपन्याना गेल्या काही आठवड्यांपासून चिपच्या कमतरतेमुळे उत्पादनात लक्षणीय कपात करावी लागली.

महिंद्रा देखील चिपचा वापर कमी करते आहे.

चिप तुटवड्याची कमतरता भरून काढण्यासाठी, महिंद्रने XUV700 SUV चे स्टेप-डाउन व्हेरियंट तयार केले आहेत, ज्यात ग्राहकांनी निवडलेल्या काही फिचर्सचा अभाव आहे. उदाहरणार्थ, ग्राहकाला ऑफर करण्यापूर्वी कंपनीने फ्लॅगशिप SUV मधील चिप-आधारित वायरलेस मोबाइल चार्जिंग हे फिचर्स काढून टाकले आहे.

महिंद्राचे कार्यकारी संचालक (ऑटोमोटिव्ह आणि फार्म इक्विपमेंट सेक्टर्स), राजेश जेजुरीकर म्हणाले, “उच्च दर्जाच्या उत्पादनांमध्ये सेमीकंडक्टरची सध्या कमतरता आहे. आम्ही XUV700 मधील आमच्या काही व्हेरियंट ऑफरशी जुळवून घेऊ शकतो ज्यामुळे ग्राहकांना कमी किमतीच्या सेटऑफवर काही फिचर्स शिवाय पर्याय मिळू शकतो.

एकंदरीत चिप्स कमतरतेमुळे ऑटो कंपन्या सध्या संकटात सापडल्या आहे.

Comments are closed.