टाटा ग्रूपच्या ‘या’ फर्मने राईट इश्यूबाबत घेतला महत्वपूर्ण निर्णय – वाचा सविस्तर

टाटा ग्रुपची हॉस्पिटॅलिटी फर्म, इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) ने मंगळवारी असे सांगितले की त्यांनी पात्र स्टेकहोल्डर एकूण 1,982.10 कोटी रुपये उभारण्यासाठी 150 रुपये प्रति शेअर इतकी राईट इश्यू किंमत निश्चित केली आहे.

टाटा ग्रूप सध्या आपल्या हॉस्पिटॅलिटी सेवामध्ये लक्ष घालत आहे. फर्म याचाच एक भाग म्हणून यासंबधित शेअर्समध्ये राईट इश्यूबाबत धोरण जाहीर करत आहे.

टाटा ग्रुपची हॉस्पिटॅलिटी फर्म, इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) ने मंगळवारी असे सांगितले की त्यांनी पात्र स्टेकहोल्डर एकूण 1,982.10 कोटी रुपये उभारण्यासाठी 150 रुपये प्रति शेअर इतकी राईट इश्यू किंमत निश्चित केली आहे.

गेल्या महिन्यात, कंपनीच्या बोर्डाने 4,000 कोटी रुपये उभारण्यास मंजुरी दिली होती, यावर्षी मात्र 3,000 कोटी उभारले जातील.

बोर्डाने 2,000 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या रकमेसाठी विद्यमान स्टेकहोल्डरना राईट इश्यूद्वारे इक्विटी शेअर्स जारी करण्यास तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना 2,000 कोटी रुपयांपर्यंत इक्विटी शेअर्स जारी करून निधी उभारण्यास मान्यता दिली होती.

मंगळवारी झालेल्या कंपनीच्या राईट्स इश्यू कमिटीच्या बैठकीत 1,982.10 कोटी रुपयांच्या एकूण रकमेसाठी प्रत्येकी 13,21,39,827 पूर्ण-पेड अप इक्विटी शेअर्स जारी करण्यास मान्यता देण्यात आली.

राइट्स इश्यू किंमत 150 रुपये प्रति पेड-अप इक्विटी शेअर अशी निश्चित करण्यात आली आहे, ज्यामध्ये प्रति इक्विटी शेअर 149 रुपये प्रीमियम देखील आहे.

हा इश्यू 24 नोव्हेंबर 2021 रोजी उघडेल आणि 8 डिसेंबर 2021 रोजी बंद होईल, असे फाइलिंगमध्ये म्हटले आहे.

13 नोव्हेंबर 2021 च्या रेकॉर्ड तारखेनुसार, कंपनीच्या पात्र इक्विटी स्टेकहोल्डरकडील प्रत्येक नऊ पेड-अप इक्विटी शेअर्ससाठी एका इक्विटी शेअर उपलब्ध केला जाईल.

Comments are closed.