‘ही’ फार्मा कंपनी आणतेय IPO, उभारणार तब्बल 6250 कोटी

कंपनी फ्रेश इक्विटी जारी करून 6,250 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. 

फार्मसी प्लॅटफॉर्म फार्मइझीची पॅरेंट कंपनी API होल्डिंग्सने सेबीकडे IPO साठी ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला आहे.

कंपनी फ्रेश इक्विटी जारी करून 6,250 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे.

API होल्डिंग्स 1,250 कोटी रुपयांच्या खाजगी प्लेसमेंटद्वारे प्री IPO फंड उभारणी पर्यायाचा देखील विचार करत आहे. प्री-राऊंड केल्यास, कंपनी IPO ची इश्यू साइज कमी करेल.

सदर IPO हा प्रायमरी इश्यू आहे आणि उपलब्ध फंडचा वापर 1,929 कोटी रुपयांच्या थकित कर्जाची परतफेड करण्यासाठी, एकूण 1,259 कोटी रुपयांच्या ऑरगॅनिक डेव्हलपमेंट प्रोजेक्टना फंड देण्यासाठी, 1,500 कोटी रूपये विस्तारासाठी वापरले जातील.

कंपनीने कोटक महिंद्रा कॅपिटल, बोफा सिक्युरिटीज, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, सिटीबँक, मॉर्गन स्टॅन्ले आणि जेएम फायनान्शियल यांची बँकर म्हणून नियुक्ती केली आहे.

कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल मागील वर्षीच्या 668 कोटींवरून 2021 मध्ये 2,335 कोटी रुपयांवर पोहोचला. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने ऑपरेशन मधून 1,197 कोटी कमावले.

2021 मध्ये कंपनीचा नेट लॉस मागील वर्षीच्या 335 कोटींवरून 645 कोटी झाला. 2021-22 च्या जून तिमाहीत हा आकडा 314 कोटी रुपयांवर पोहोचला.

 

Comments are closed.