अनवधानाने तब्बल 84 हजार लोकांच्या खात्यात कर्ज जमा केलेल्या ‘या’ बँकेचा शेअर्स घ्याल का? वाचा ब्रोकेरेज फर्मची मते

इंडसइंड बँकेचे शेअर आज मार्केटमध्ये ११% घसरले. इंडसइंड बँकेच्या व्यवस्थापनाने ‘लोन एवरग्रीनिंग' आरोपांचे खंडन केले आहे. तांत्रिक बिघाडामुळे ग्राहकांच्या संमतीशिवाय सुमारे 84 हजार खात्यांमध्ये चुकून कर्जवाटप झाल्याचे बँकेने स्पष्ट केल.

शेअर मार्केटमध्ये रोजच काहीनाकाही घडामोडी चालू असतात.शेअर्समध्ये चढ-उतार देखील कमी जास्त प्रमाणात होतच असते, पण काही शेअर्स मात्र अचानक मोठ्या प्रमाणात कोसळतात, त्यामागे मात्र काहीतरी विशेष कारण असत. असच काहीतरी इंडसइंड बँकेच्या शेअर्सबाबतीत झालं.

इंडसइंड बँकेचे शेअर आज मार्केटमध्ये तब्बल 9 टक्क्यांनी घसरले. शेअरहोल्डरना यामुळे नुकसान सोसावे लागले.लोन एवरग्रीनिंगमुळे बँकेचे शेअर्स कोसळले गेले असे सध्या बोलले जात आहे.

इंडसइंड बँकेच्या व्यवस्थापनाने ‘लोन एवरग्रीनिंग’ आरोपांचे खंडन केले आहे. तांत्रिक बिघाडामुळे ग्राहकांच्या संमतीशिवाय सुमारे 84 हजार खात्यांमध्ये चुकून कर्जवाटप झाल्याचे बँकेने स्पष्ट केले.

काय आहेत ब्रोक्रेजर्सची मते – 

मोतीलाल ओसवाल यांच्यामते “ प्रतिकूल मीडिया रिपोर्ट्स आणि इतर काही MFI कर्जदारांनी नोंदवलेल्या आक्षेपमुळे स्टॉकवर काही प्रमाणात दबाव येऊ शकतो. तरीसुद्धा, आम्‍हाला आशा आहे की प्रभाव नियंत्रित केला जाईल. यामुळे आम्ही 1,400 च्या टार्गेटसह BUY कायम ठेवतो आहोत.”

ब्रोकरेज हाऊस Emkay नुसार बँकेची टर्नअराउंड स्टोरी कायम आहे,परंतु दीर्घकालीन रेटिंग टिकवून ठेवण्यासाठी क्रेडिट अंडररायटिंग/रिस्क मॅनेजमेंट आणि स्टेकहोल्डर्सशी संवाद मजबूत करण्यासाठी बँकेस अधिक काम करणे आवश्यक आहे. त्यांनी 1,460 च्या टार्गेटसह स्टॉकवर बाय रेटिंग कायम ठेवली आहे.

इंडसइंड बँकेने यापूर्वी सांगितले होते की, तांत्रिक बिघाडामुळे ग्राहकांच्या खात्यात त्यांच्या संमतीविना कर्ज वितरित केले गेले आणि ही समस्या दोन दिवसांत दूर झाली. बँकेने म्हटले आहे की, त्यांनी कर्ज वितरणासाठी बायोमेट्रिक अधिकृतता अनिवार्य केली आहे आणि BFIL वरही ते काम करत आहेत.

Comments are closed.