Nykaa IPO साठी आज शेअर वाटप होण्याची शक्यता,कसं कराल चेक – वाचा सविस्तर

Nykaa IPO चे शेअर वाटप आज होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या बोलीच्या अंतिम दिवशी IPO 82 पेक्षा जास्तवेळा सबस्क्राइब केला गेला.

मागच्या आठवड्यात Nykaa IPO बाजारात दाखल झाला होता. IPO ने या दरम्यान गुंतवणूकदारांची भरपूर पसंती मिळवली. दरम्यान IPO चे शेअर वाटप देखील लवकर होण्याची अपेक्षा आहे.

Nykaa IPO चे शेअर वाटप आज होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या बोलीच्या अंतिम दिवशी IPO 82 पेक्षा जास्तवेळा सबस्क्राइब केला गेला.

गुंतवणुकदार Intime India Private Limited या वेबसाईटवर शेअर वाटप तपासू शकतात किंवा बीएसई वेबसाइटवर देखील स्टेटस पाहू शकतात.

इक्विटी शेअर्स, एकदा वाटप केल्यानंतर, 10 नोव्हेंबर 2021 रोजी खात्यात क्रेडिट केले जाऊ शकतात. कंपनीचे शेअर्स 11 नोव्हेंबर रोजी NSE आणि BSE वर लिस्टिंग होण्याची अपेक्षा आहे.

ऑफर 28 ऑक्टोबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडली गेली आणि 1 नोव्हेंबर रोजी संपली. IPO मध्ये एकूण 630 कोटी पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि प्रमोटीकडून 41,972,660 इक्विटी शेअर्सच्या OFS चा समावेश आहे. पब्लिक इश्यूचा प्राइस बँड 1,085-1,125 प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता.

Comments are closed.