गुंतवणूकदारानो सावधान! तुमचा डेटा होतोय लीक, CyberX9 चा खळबळजनक खुलासा

सायबर सेक्युरीटी स्टार्टअप CyberX9 नुसार CDSL ची उपकंपनी, CDSL Ventures Limited (CVL) कडून 10 दिवसांच्या कालावधीत तब्बल दोन वेळा 4 कोटींहून अधिक भारतीय गुंतवणूकदारांचा वैयक्तिक आणि आर्थिक डेटा लीक झाला आहे.

सायबर सेक्युरीटी स्टार्टअप CyberX9 नुसार CDSL ची उपकंपनी, CDSL Ventures Limited (CVL) कडून 10 दिवसांच्या कालावधीत तब्बल दोन वेळा 4 कोटींहून अधिक भारतीय गुंतवणूकदारांचा वैयक्तिक आणि आर्थिक डेटा लीक झाला आहे.

सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (CDSL) ही सेबीकडे नोंदणीकृत डिपॉझिटरी आहे आणि CDSL Ventures Ltd ही KYC नोंदणी करणारी संस्था आहे, जीची सेबीकडे स्वतंत्रपणे नोंदणी आहे.

दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना CDSL ने सांगितले की, CVL ने यावर तत्काळ कारवाई केली आहे आणि सध्या डेटा सुरक्षित आहे.

CyberX9 नुसार, त्यांनी 19 ऑक्टोबर रोजी CDSL ला सदर माहिती दिली होती. हे सर्व नीट करण्यास CDSL ला सुमारे 7 दिवस लागले, परंतु हे त्वरीत केले जाऊ शकले असते.

CyberX9 चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक हिमांशू पाठक यांनी सांगितले की,”आम्ही फर्मला माहिती दिल्यानंतर त्यांनी सुरक्षेबाबत काम सुरू केले, परंतु हे सर्व गडबडीत केल्याचे आम्हाला नंतर निदर्शनास आले, कारण सदर सुधारित कल्पना लगेच हॅक केल्या जाऊ शकत होत्या.

लीक झालेल्या डेटामध्ये गुंतवणूकदारांचे नाव, फोन नंबर, ईमेल पत्ता, पॅन, वडिलांचे नाव, जन्मतारीख इत्यादींचा समावेश आहे, असे CyberX9 ने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

CDSL शी संपर्क साधला असता ते म्हणाले की, CDSL मध्ये कोणतीही सुरक्षा समस्या किंवा डेटा लीक झालेला नाही.

सरकारकडून CDSL चे सुरक्षा ऑडिट करण्याची गरज आहे,”असेही CyberX9 ब्लॉगने म्हटले आहे.

Comments are closed.