मॅकडोनाल्ड भारतात गुंतवणूक वाढवणार, स्टोअर्स सर्व्हिस देखील वाढवणार

Westlife Development will look at adding another 150-200 stores in the next 3-4 years

मॅकडोनाल्डच्या वेस्टलाइफ डेव्हलपमेंटने बुधवारी सांगितले की, ते पुढील 3-4 वर्षात आणखी 150-200 स्टोअर निर्माण करण्याचा विचार करत आहेत. तसेच यासाठी संपूर्ण व्यवसायात ते 800-1000 कोटींची गुंतवणूक करतील. वेस्टलाइफ डेव्हलपमेंट हे भारताच्या पश्चिम आणि दक्षिण भागातील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट्सचे मालक आणि ऑपरेटर आहे.

वेस्टलाइफने एका निवेदनात म्हटले आहे की, ते भारतात आपली 25 वर्षे पूर्ण करत आहेत. याप्रसंगी उपाध्यक्ष अमित जटिया म्हणाले की, गेल्या 25 वर्षांत कंपनीने देशात महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे आणि येत्या काही वर्षात मोठ्या प्रगतीची अपेक्षा आहे.

“कंपनी पुढील 3-4 वर्षात आणखी 150-200 स्टोअर्स उपलब्ध करण्याकडे लक्ष देईल. बर्गर, चिकन आणि कोल्ड्रिंक्स सेगमेंटमध्ये कंपनी आपले स्थान आणखी मजबूत करेल आणि बाजाराच्या वाढीस मदत करेल.”

भारतात कंपनीचे 25 वे वर्ष तसेच बर्गर श्रेणीतील आपले नेतृत्व अधिक मजबूत करण्यासाठी कंपनीने अलीकडेच गोरमेट बर्गरच्या नवीन श्रेणीचे अनावरण केले आहे.

वेस्टलाइफ पुढील 3-4 वर्षांमध्ये व्यवसायात 800-1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. ही गुंतवणूक फुटप्रिंट्स वाढवण्यासाठी, मेनू इंनोवेशन, कंपनीची पुरवठा साखळी बळकट करण्यासाठी केली जाईल.

“या सर्व उपक्रमांमुळे उद्योगात 6000-8000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.

वेस्टलाइफने पुढे सांगितले की, ते वाढीच्या पुढील टप्प्यात कंपनी अधिक अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि डेटा विश्लेषणात्मक साधने वापरेल, जेणेकरुन ग्राहकांना चांगली सुविधा मिळेल.

Comments are closed.