नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन झालं स्वस्त, प्लॅनच्या किमती उतरल्या
नेटफ्लिक्सने मंगळवारी भारतातील आपल्या चारही सबस्क्रिप्शन प्लॅनच्या किमती कमी केल्या आहेत.व्यवसायासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पण तुलनेने कमी युजर्स असल्यामुळे नेटफ्लिक्सने भारतात आपला पाया विस्तारण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
नेटफ्लिक्सने मंगळवारी भारतातील आपल्या चारही सबस्क्रिप्शन प्लॅनच्या किमती कमी केल्या आहेत. व्यवसायासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पण तुलनेने कमी युजर्स असल्यामुळे नेटफ्लिक्सने भारतात आपला पाया विस्तारण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
नेटफ्लिक्सने फ्लॅगशिप बेसिक प्लॅनच्या किमतीत कपात केली आहे. सदर प्लॅन 60 टक्क्यांनी कमी केला आहे. कंपनीने प्लॅन 199 वरून 149 रुपये कमी केला आहे.
एकाच वेळी चार वेगवेगळ्या डिव्हाइसेसचा अॅक्सेस देणारा प्रीमियम प्लॅन 649 रुपये (रु. 799 वरून) आणि स्टँडर्ड प्लॅन, जो दोन अॅक्सेसला परवानगी देतो, 499 रुपये (649 वरून) इतका कमी करण्यात आला आहे.
मोनिका शेरगिल, (नेटफ्लिक्सच्या उपाध्यक्ष) म्हणाल्या,“ही ग्राहकांसाठी द्वि-पक्षीय ऑफर आहे. आम्ही किंमत कमी करत आहोत आणि ऑफर देत आहोत. हे मोठ्या कंटेट लाइनअपसह देखील येते.
नेटफ्लिक्स आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या अमेझॉन प्राइमच्या तुलनेतवर किंमती करत आहे, मात्र वार्षिक प्लॅन 999 वरून 1,499 वर वाढवत आहे. परिणामी, नेटफ्लीक्स आणि अमेझॉन प्राईम मधील अंतर कमी होत आहे. दरम्यान, प्राइम विनामूल्य अमेझॉन डिलिव्हरी आणि संगीत सेवा यांसारख्या विशेष ऍड-ऑनसह येतो.
Media Partners Asia’s (MPA) च्या अंदाजानुसार, नेटफ्लिक्स जगभरातील सबस्क्रिप्शन ग्राहकांच्या बाबतीत खूप मागे आहे. 2021 च्या अखेरीस 5.5 मिलियन मेंबर जोडण्याची अपेक्षा आहे. यातुलनेत Hotstar Disney (46 मिलियन) आणि अमेझॉन प्राईम 21.8 मिलियन सबस्क्रिप्शन घेतील.
कमाईच्या बाबतीत, नेटफ्लिक्स चार्टमध्ये शीर्षस्थानी आहे. 2020 मध्ये सबस्क्रिप्शन कमाईच्या वाटा वर आधारित, नेटफ्लिक्सने 38 टक्के, अमेझॉन प्राईम 19 टक्के आणि Disney Hotstar ने 21 टक्के कमाई केली.
Comments are closed.