संपूर्ण महाराष्ट्रात प्रवासी वाहन कर्जाची मागणी मजबूत राहण्याची शक्यता
- प्रश्नः वाहन कंपन्यांनी २०२३ मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढीचा वेग कायम राखला आहे. या भावनेचा प्रवासी वाहन (PV) कर्जांमधील वितरण आणि कर्जातील वाढीवर कसा परिणाम झाला आहे?
उत्तरः एक उत्साही अर्थव्यवस्था सामान्यत: प्रवासी वाहन (PV) कर्जासह विविध कर्ज विभागांमध्ये मागणी उत्तेजित करते. आमच्या अनुभवानुसार महाराष्ट्रातील टियर दोन, तीन आणि चार श्रेणीतील शहरांमध्ये पीव्ही कर्जाला असलेली मागणी स्पष्टपणे दिसत आहे. वित्तीय वर्ष 24 मध्ये, आम्ही वितरित केलेल्या सर्व पीव्ही कर्जांमध्ये महाराष्ट्राचा वाटा 8.72 टक्के इतका होता. आमच्या कर्जाचा सरासरी आकार 4,00,000 रुपयांदरम्यान आहे. वित्तीय वर्ष 24 मध्ये, आम्ही महाराष्ट्रातील 18,478 कर्जदारांना अंदाजे 645 कोटी रुपयांचे कर्ज वितरित केलेले आहे. तसेच, गेल्या काही महिन्यांपासून कर्जाच्या मागणीसाठी आमच्याकडे सातत्याने विचारणा होत आहे. यातून महाराष्ट्राच्या बाजारपेठेत मोठी क्षमता दडलेली असून तिचा वापरच झालेला नाही, हे आम्हाला कळेल आहे. ग्राहक वर्गाला प्रवासी व्यावसायिक वाहने आणि खासगी कार पुरवण्यावर आमचे धोरणात्मक लक्ष केंद्रीत झालेले आहे. या विभागात मजबूत मागणी आणि व्यवसाय पूर्वपदावर येत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. - प्रश्नः प्रवासी वाहनांच्या कर्ज विभागामध्ये, विलीनीकरणानंतर तुम्हाला दिसलेला सर्वात लक्षणीय बदल कोणता आहे. विशेषतः संकलन आणि कर्ज वितरणाच्या बाबतीत तो कसा आहे?
उत्तरः व्यावसायिक वाहनांची सर्वात मोठी वित्तपुरवठादार असलेली श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी आणि दुचाकीसाठी सर्वाधिक वित्तपुरवठा करणारी त्याचबरोबर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) वित्तपुरवठा करणारी अग्रणी कंपनी असलेल्या श्रीराम सिटी युनियन फायनान्स यांच्यातील विलीनीकरणाचे फायदे हा सकारात्मक बदल अधोरेखित करतोय. त्याचबरोबर आव्हानात्मक आर्थिक परिस्थितीशी जुळवून घेण्याची आमची क्षमताही तयार झाली असून त्यामुळे दीर्घकालीन यशाबद्दल आम्हाला आत्मविश्वास आहे. - प्रश्नः विलीनीकरण झाल्यापासून महाराष्ट्रातील सर्व कर्ज प्रकारांमध्ये तुमच्या व्यवसायाची कामगिरी कशी झालेली आहे?
उत्तरः आमच्या मूल्यांप्रती असलेली आमची बांधिलकी ही आमच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे. विविध गरजांनुसार वित्तीय पुरवठ्याचे पर्याय तयार करत आम्ही ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन स्वीकारलेला आहे. आमच्या ग्राहकांना मिळत असलेल्या अनुभवाचा दर्जा आम्ही खूप सुधारला आहे. तसेच आमच्या डिजिटल मंचाचा विस्तार करून आमचे कामकाज अधिक सुरळीत, सोपे केले आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने आम्हाला व्यवसायाचे व्यवस्थापन उत्तम रितीने करण्यात तसेच मालमत्तेची गुणवत्ता टिकवून ठेवण्यास खूप मदत झालेली आहे. 130 पेक्षा अधिक रिटेल वित्तपुरवठा शाखा जोडणे, नवीन वाहन डीलर्ससोबत भागीदारी करणे आणि प्राधान्य वित्तपुरठादार दर्जासाठी ओईएमबरोबर (मूळ वाहन उत्पादक) भागीदारी केल्यामुळे आम्हाला महाराष्ट्रात अधिकाधिक ग्राहकांपर्यत पोहोचणे खूपच सोपे झाले आहे. श्रीराम फायनान्स ब्रँड अंतर्गत अनेक उत्पादनांच्या क्रॉस-सेलिंगमुळे आम्हाला ग्राहकांशी मजबूत संबंध निर्माण करण्यात मदत झाली आहे आणि उद्योग सुधारला आहे..
उभय कंपन्यांतील विलीनीकरणानंतर, आम्ही अधिकाधिक सेवा जोडल्या आहेत. तसेच जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि नवीन संधी शोधण्यासाठी बाजारपेठेतील आमचा सहभागसुध्दा वाढवला आहे. तसेच विस्तृत उत्पादनांच्या प्रकाराचा अतिशय धोरणात्मक पध्दतीने वापरही आम्ही करत आहोत. विलीनीकरणानंतर, श्रीराम फायनान्सच्या जून 2024 पर्यंतच्या एकूण 2,33,443 कोटी रुपयांच्या आर्थिक मालमत्ता व्यवस्थापनामध्ये (एयूएम) महाराष्ट्र युनिटने तब्बल 23,918 कोटी रुपयांचे योगदान दिलेले आहे.
Comments are closed.