वापरलेल्या व्यावसायिक वाहनांच्या किमतीत मोठी वाढ, तर प्रवासी वाहनांच्या किमतींत घट
वापरातील व्यावसायिक वाहनांच्या (यूज्ड कमर्शिअल वेहिकल्स – यूसीव्ही) सर्व वजन श्रेणींमध्ये वर्षभरात किंमतीत चांगली वाढ दर्शविली गेली आहे. विशेषतः 2 ते 3.5 टन चार चाकी यूसीव्हीच्या किमतीत 47 टक्क्यांनी तर 1.5 ते 2-टन श्रेणीत किंमतीत 36 टक्के वाढ झाली आहे.
वापरलेल्या प्रवासी वाहनांच्या किमतीत विशेषतः सेडान आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही मध्ये वार्षिक आधारावर 6 ते 10 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. मारुती स्विफ्ट आणि मारुती एर्टिगाच्या किमती जुलैमध्ये (वार्षिक आधारावर) 10 टक्क्यांनी घसरल्या, तर महिंद्रा स्कॉर्पिओ आणि ह्युंडाई क्रेटाच्या पुनर्विक्रीच्या किमती 6 टक्क्याने घटल्या. वापरलेल्या दुचाकींच्या प्रकारात होंडा शाइन आणि बजाज पल्सर वगळता बहुतेक श्रेणींमध्ये किंमती वाढल्या आहेत आणि केवळ या दोन गाड्यांच्या किंमतीत जुलैत (वार्षिक आधारावर) अनुक्रमे 3 आणि 2 टक्क्यांची घट झाली आहे.
दीर्घ कालावधीनंतर बाजारात पुन्हा सवलतीचा प्रवाह आल्याने नवीन वाहनांच्या विक्रीत वाढ झालेली आहे. जुलैमध्ये मासिक आधारावर कार विक्रीत 11 टक्के वाढ तर वार्षिक आधारावर 9 टक्के वाढ झाली. दुचाकी वाहनांची विक्री मासिक आधारावर 5 टक्क्यांनी वाढली (वार्षिक आधारावर 17 टक्के वाढ). व्यावसायिक वाहनांच्या विक्रीतही मासिक आणि वार्षिक आधारावर वृध्दी झाली असून कार्टसह ई-रिक्षाच्या विक्रीत वार्षिक 87 टक्के वाढ नोंदवली गेली असून व्यावसायिक ट्रॅक्टरने मासिक आधारावर 19 टक्के वाढ नोंदवली आहे.
जुलै मध्ये पेट्रोल इंधनाच्या वापरात फारसा बदल दिसून आलेला नसताना, डिझेलचा वापर जून 2024 च्या तुलनेत 10 टक्क्यांनी कमी झाला. त्याचप्रमाणे, आंतर-राज्य आणि आंतर-राज्य ई-वे बिल निर्मिती, पुरवठादारांची संख्या, आणि ई-वे बिल मूल्य हे सर्व जून 2024 मध्ये मासिक आधारावर घटले आहे. फास्टटॅग टोल संकलन देखील जून 2024 च्या संकलनाच्या तुलनेत स्थिर राहिले आहे.
श्री. वाय. एस. चक्रवर्ती, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीराम फायनान्स लिमिटेड जुलै २०२४ च्या मोबिलिटी बुलेटिनबद्दल बोलताना म्हणाले की, “खरीफ हंगाम जवळ आल्याने आणि मान्सूनच्या चांगल्या पावसामुळे जलाशयांमध्ये मुबलक पाणी साठल्याने येत्या काही महिन्यांत ग्रामीण भागातील व्यवहारांना गती मिळेल. उत्पादक देखील उत्पादनांच्या श्रेणींमध्ये सणासुदीच्या उच्च खरेदीच्या अपेक्षेने व्यावसायिक केंद्रांना पुरवठा वाढवत आहेत. एकूण भावना सकारात्मक होत असल्याचे आपण पाहत आहोत. ग्रामीण वाहतुकीचा कणा असलेल्या दुचाकींची विक्री चांगली होईल अशी अपेक्षा आहे. D2D (दसरा ते धनत्रयोदशी) मध्ये दुचाकींची विक्री 54 लाख ते 55 लाख युनिट असू शकते, जी गेल्या वर्षीच्या जवळपास 45 लाखांपेक्षा जास्त आहे.”
Comments are closed.