RBI ने ‘ह्या’ दोन फर्मना दिलं SFB ग्रँट, लवकरच सुरु होईल सेवा

The small finance bank, incorporated as Unity Small Finance Bank, will take over the assets and liabilities of Punjab and Maharashtra Co-operative Bank.

भारतीय रिझर्व्ह बँकेने 10 ऑक्टोबर रोजी सेंट्रम फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड (सेंट्रम) आणि रेझिलिएंट इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (भारतपे) यांच्या कनकन्सोर्टियमला स्मॉल फायनान्स बँकेचा परवाना जारी केला आहे.

सदर संस्था पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेची ॲसेट आणि लियाबिलिटी घेईल.

सेंट्रमचे एमएसएमई आणि मायक्रो फायनान्स व्यवसाय युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत विलीन केले जातील.

सेंट्रमने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, दोन्ही पार्टनर हे बँक तयार करण्यासाठी एकत्र येत आहेत आणि प्रस्तावित व्यवसाय मॉडेल हे सहकार्य आणि खुल्या आर्किटेक्चरपैकी एक असेल.

सेंट्रम ग्रूपचे कार्यकारी अध्यक्ष जसपाल बिंद्रा म्हणाले, “आम्हाला परवाना मिळाल्याबद्दल आनंद होत आहे आणि एक मजबूत टीमसह ही नवीन बँक तयार करण्यासाठी भारतपे सोबत भागीदारी करण्यास आम्हाला आनंद झाला आहे. भारताची पहिली डिजिटल बँक बनण्याची आमची इच्छा आहे”.

अशनीर ग्रोव्हर म्हणले,“भारतपे आणि सेंट्रम यांना एसएफबी परवाना सोपविल्याबद्दल मी आरबीआयचे आभार मानू इच्छितो. ही संधी मिळवण्यासाठी आणि भारताची पहिली खऱ्या अर्थाने डिजिटल बँक उभारण्यासाठी आम्ही अथक परिश्रम करू.

आरबीआयने सेन्ट्रम फायनान्शिअल सर्व्हिसेसना स्मॉल फायनान्स बँक स्थापन करण्यासाठी “तत्वतः” मान्यता दिली होती, ज्यामुळे संकटात सापडलेल्या पीएमसी बँकेचा ताबा घेण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

Comments are closed.