रिलायन्सची दिवाळी गूगल सोबत, लवकरच करणार ‘ हा ‘एकत्रित प्रोजेक्ट लाँच
Reliance to launch 'world's most affordable' JioPhone Next before Diwali
गूगल आणि रिलायन्स यांचा संयुक्त प्रोजेक्ट जियोफोन नेक्स्ट दिवाळीपूर्वी बाजारात आणण्यासाठी तयारी सुरु आहे.
24 जून 2021 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या AGM मध्ये जियोफोन नेक्स्ट ह्या 4G हँडसेटचे अनावरण केले. अनावरण करताना, अंबानी म्हणाले की जियोफोन नेक्स्ट हा सर्वात परवडणारा स्मार्टफोन असेल.
रिलायन्सने अलीकडेच जियोफोन नेक्स्टबद्दल काही माहिती शेअर केली आहे. त्यात सदर मेड-इन-इंडिया स्मार्टफोनकरिता त्यांनी गूगलसोबत कसे काम केले याची माहिती आहे.
भारतातील अंदाजे 300 मिलियन 2G युजर्सना 4G मध्ये शिफ्ट होण्यास मदत करणे हा फोनचा उद्देश आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमच्या ऑप्टिमाइझ्ड व्हर्शनद्वारे समर्थित आहे.
जियोफोन नेक्स्ट स्क्रीन टेक्स्टचे ऑटोमॅटिक रीड-अलाऊड, लांग्वेज ट्रांस्लेट, ऑगमेंटेड रिअॅलिटी फिल्टरसह स्मार्ट कॅमेरा आणि व्हॉईस असिस्टंट सारखे फिचर्स देतो. गूगलने व्हॉइस-फर्स्ट फीचर्सवर भरपूर काम केले आहे, जे जियोफोन नेक्स्ट युजर्सना विविध लाभ देईल.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा फोन सुरुवातीला 10 सप्टेंबरला भारतात येणार होता, परंतु जागतिक सेमीकंडक्टर कमतरतेमुळे हा मुहूर्त लांबला.
जियोफोन नेक्स्टचे फिचर्स
जियोफोन नेक्स्टमध्ये 2GB RAM सह Snapdragon 215 SoC द्वारे आहे. 3GB RAM व्हेरिएंट असण्याची देखील शक्यता असू शकते. फोनला 16GB आणि 32GB स्टोरेज ऑप्शन देखील मिळू शकतात ज्यात मायक्रोएसडी कार्डचा वापर केला जाऊ शकतो.
ऑप्टिक्ससाठी, जियोफोन नेक्स्ट मध्ये 13MP सिंगल रिअर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा असू शकतो. मायक्रो-यूएसबी पोर्टवर चार्जिंगसह ती 2,500 एमएएच बॅटरी पॅक असेल. डिव्हाइस KaiOS ऐवजी Android 11 वर चालेल.
भारतात जिओफोन नेक्स्टची किंमत 3,499 रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.