तयार रहा! या आठवड्यात येणार दोन IPO 

या आठवड्यात मार्केटमध्ये दोन कंपन्या त्यांचे IPO सुरू करण्याची योजना आखत आहेत.ऑटो कंपोनेंट बनवणारे संसेरा इंजिनिअरिंग आणि मार्कोलाइन ट्रॅफिक कंट्रोल्स  लिमिटेड ह्या दोन कंपन्या लवकरच IPO आणणार आहेत. संसेरा इंजिनिअरिंगचा आयपीओ मंगळवार १४ सप्टेंबर रोजी खुला होईल, तर मार्कोलाइन ट्रॅफिक कंट्रोल्स लिमिटेडचा IPO १५ सप्टेंबर रोजी खुला होणे अपेक्षित आहे. दोन्ही कंपन्यांचे तीन दिवसांचे इश्यू अनुक्रमे १६ सप्टेंबर आणि २० सप्टेंबर रोजी बंद होतील.

संसेरा इंजिनिअरिंग ह्या ऑटो-कंपोनंट मेकरचा IPO ७३४-७४४ रू प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. पब्लिक इश्यू म्हणजे पूर्णपणे ऑफर फॉर सेल असणार आहे ज्याद्वारे प्रमोटर आणि विद्यमान स्टेकहोल्डर आपले १,७२ ,४४,३२८ शेअर्स विकतील. संसेरा इंजिनिअरिंग ही कंपनी ऑटोमोटिव्ह आणि नॉन-ऑटोमोटिव्ह क्षेत्रांमधील कंपन्यांसाठी कंपोनंट तयार करते. दुचाकी तसेच प्रवासी वाहनांसाठी कंपनी कनेक्टिंग रॉड्स, क्रॅन्कशाफ्ट्स, रॉकर आर्म्स आणि गिअर शिफ्टर फोर्क्सची निर्मिती करते.

मार्कोलाईन ट्रॅफिक कंट्रोल लिमिटेड ही हायवे ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स सर्व्हिस पुरवणारी आघाडीची कंपनी आहे. बीएसईकडे दाखल केलेल्या प्रॉस्पेक्टसनुसार, ५१,२८,००० इक्विटी शेअर्स ७७८ रू प्रति शेअरच्या किंमतीवर ऑफर केले जाणार आहेत. कंपनीने कॅपिटल बेस मजबूत करण्यासाठी इश्यूच्या उत्पन्नाचा वापर करण्याची योजना आखली आहे.

 

मार्कोलाइन ट्रॅफिक कंट्रोल्स लिमिटेडने २००२ मध्ये बिझनेस सुरू केला होता. सुरुवातीला कंपनी रोड मार्किंग करत होती. त्यानंतर २००९ मध्ये कंपनीने हायवे ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स क्षेत्रात प्रवेश केला.

Comments are closed.