जेट एअरवेज पुन्हा घेणार भरारी – शेअरला लागले अप्पर सर्किट 

जेट एअरवेजने डोमेस्टिक ऑपरेशन सुरु करण्याची घोषणा केल्यानंतर १३ सप्टेंबर रोजी जेट एअरवेजच्या शेअर्सची किंमत ५ टक्क्यांनी वाढत अप्पर सर्किट लागले. जालान कॅलरॉक कन्सोर्टियमने १३ सप्टेंबर रोजी सांगितले, “जेट एअरवेज २०११ च्या पहिल्या क्वार्टरपासून डोमेस्टिक ऑपरेशन पुन्हा सुरू करेल”. एप्रिल २०१९ मध्ये बंद करण्यात आलेली ही एअरलाईन जवळपास तीन वर्षांनी पुन्हा सुरू होणार आहे. नवी दिल्ली ते मुंबई उड्डाणाने सेवा पुन्हा सुरू होईल.

कन्सोर्टियमचे प्रमुख सदस्य मुरारीलाल जालान म्हणाले की, २०२२ च्या तिसऱ्या किंवा चौथ्या तिमाहीत इंटरनॅशनल ऑपरेशन्स पुन्हा सुरू करण्याचे विमान कंपनीचे लक्ष्य आहे. “सध्या बंद असलेल्या या एअरलाईनच्या सुविधा पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणारे एअर ऑपरेटर सर्टिफिकेट (एओसी) चे रिव्हॅलिडेशन करण्याचे कामकाज सुरु आहे. कन्सोर्टियमने निवेदनात म्हटले आहे की, स्लॉट वाटप,आवश्यक पायाभूत सुविधा आणि रात्रीच्या पार्किंगसाठी अथॉरिटीज बरोबर आम्ही करत आहोत असेही त्यांनी सांगितले.

तीन वर्षात ५० हून अधिक आणि पाच वर्षांत १०० हून अधिक विमाने उपलब्ध करून देण्याची योजना आहे. विमाने आपल्या ताफ्यात आणण्यासाठी लॉंग टर्म  लीजिंग चा पर्याय अमलात आणला जाणार आहे असेही जालान यांनी सांगितले.  एनसीएलटीने २२ जून रोजी कॅलरॉक-जालानच्या रिझोल्यूशन योजनेला मंजुरी दिली होती. एनसीएलटीच्या मुंबई खंडपीठाने डायरेक्टरेट जनरल ऑफ एव्हिएशनला २२ जूनपासून ९० दिवस जेट एअरवेजला स्लॉट वाटप करण्यासाठी दिले होते.

आज सकाळी कंपनीचा स्टॉक ५ टक्क्यांनी वाढून ८३.५० रुपयांवर पोहचला आहे.

Comments are closed.