आयफोनवरची ही भन्नाट ऑफर दवडू नका

Apple iPhone 12 series smartphones are selling on discount ahead of the launch of iPhone 13 series.

१४ संप्टेंबर रोजी ॲपल आपल्या ॲन्युल इव्हेंट मध्ये स्मार्टफोनची नविन जनरेशन लॉन्च करणार आहे. आयफोन १३ सीरीजमध्ये अधिक पॉवरफुल प्रोसेसर, हार्डवेअर अपग्रेड यांसारखे बदल असण्याची अपेक्षा आहे. कंपनीने डिस्काउंट उपलब्ध केल्यामुळे स्मार्टफोन खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे.

ॲपल आयफोन १२ सीरीजचे फोन फ्लिपकार्ट वर उपलब्ध आहेत .ॲपल आयफोन १२ मिनी चे ६४ GB आणि १२८ GB व्हर्जन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर अनुक्रमे ५९,९९९ आणि ६४,९९९ रू पर्यंत उपलब्ध आहेत.यांच्या मूळ किंमती अनुक्रमे ६९,९०० आणि ७४,९०० आहेत. तर २५६ GB व्हेरिएंट, ७४,९९९ रू किमतीवर उपलब्ध आहे.

६४ GB स्टोरेजसह ॲपल आयफोन १२ ७९,९९० ऐवजी, ६६,९९९ रू मध्ये उपलब्ध आहे, तर १२८ GB वेरिएंट ८४,९०० ऐवजी ७१,९९९ रू मध्ये उपलब्ध आहे. आयफोन १२ चे २५६ GB वेरिएंट ९४,९०० ऐवजी ८१,९९९ रू मध्ये उपलब्ध आहे.

१२८ GB स्टोरेज असलेला ॲपल आयफोन १२ Pro फ्लिपकार्टवर १,१५,९०० रू मध्ये उपलब्ध आहे, तर २५६ GB वेरिएंट १,२५,९०० रू मध्ये उपलब्ध आहे. तर ५१२ GB व्हेरिएंट १,४५,९०० मध्ये उपलब्ध आहे. आयफोन १२ प्रो मॅक्सचे तीन प्रकार – १२८ जीबी, २५६ जीबी आणि ५१२ जीबी स्टोरेजसह अनुक्रमे १,२५,९०० आणि १,५५,९०० रू. वर उपलब्ध आहेत.

ॲपल आयफोन १२ सीरिज A14 बायोनिक चिप नेक्स्ट जनरेशन न्यूरल इंजिनसह चालते. आयफोन १२ मिनी आणि आयफोन १२ मध्ये मागील बाजूस दोन कॅमेरा मॉड्यूल आहेत, ज्यामध्ये १२ एमपी अल्ट्रा वाइड कॅमेरे आहेत. आयफोन १२ प्रो आणि आयफोन १२ प्रो मॅक्सला अतिरिक्त १२ एमपी टेलिफोटो कॅमेरा मिळतो. हे सर्व डीव्हॉईस 5G क्षमतेसह iOS १४ वर चालतात.

Comments are closed.