बिग बुलने मार्च २०२१ अखेर या कंपन्यांमध्ये मालकी वाढवली, तुमच्याकडे आहेत का शेअर?
भारतीय शेअर मार्केटचे बिग बुल म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या राकेश झुनझुनवाला यांनी मार्च २०२१ अखेरीस पाच कंपन्यांमध्ये आपली मालकी वाढवली आहे. याशिवाय दोन नव्या कंपन्यांमध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे.
राकेश झुनझुनवाला हे विविध कंपन्यांच्या मार्फत भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करत असतात. त्या कंपन्या खालीलप्रमाणे
१. झुनझुनवाला राकेश राधेश्याम
२. झुनझुनवाला रेखा राकेश
३. राकेश झुनझुनवाला (वैयक्तिक गुंतवणूक)
४. रेखा राकेश झुनझुनवाला
४. राकेश झुनझुनवाला (रेअर इंटरप्राइझेस या कंपनीतील पार्टनर म्हणून)
राकेश झुनझुनवाला यांनी खालील कंपन्यांमध्ये आपली मालकी वाढवली आहे.
१. फोर्टिस हेल्थकेअर – ३.९७% वरून ४.३१%
२. टीव्ही१८ ब्रॉडकास्ट – २.५१% वरून २.६%
३. ज्युबीलीअंट फार्मोवा – ५.८२% वरून ६.२९%
४. ऍग्रो टेक फूड्स – ८. ०१% वरून ८.२२%
५. एमसीएक्स – ३.९२% वरून ४.९%
या कंपन्यांबरोबरच झुनझुनवाला यांनी नजारा टेक्नोलॉजीज आणि ज्युबीलीअंट इंग्रेव्हीया या दोन कंपन्यांमध्ये नव्याने गुंतवणूक केली आहे.
नजारा टेक्नॉलिजीजमध्ये झुनझुनवाला यांचा १०% स्टेक आहे. नजारा ही कंपनी ऑनलाईन गेमिंग क्षेत्रात आघाडीची कंपनी म्हणून ओळखली जाते. ज्युबीलीअंट इंग्रेव्हीया ही इंटिग्रेटेड लाईफ सायन्स क्षेत्रातील उत्पादने बनवणारी कंपनी असून गेल्या काही महिन्यांत कंपनीच्या स्टॉकमध्ये चांगली रॅली दिसून आली आहे.
Comments are closed.