रिलायन्स बद्दल जेफरीजचा मोठा दावा, शेअरमध्ये होणार ‘एवढी’ वाढ 

जेफरीज या आर्थिक सुविधा पुरविणाऱ्या जगविख्यात कंपनीने नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीज या स्टॉकबद्दल एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात रिलायन्सला त्यांनी ‘बाय’ रेटिंग दिले आहे.

जेफरीजच्या अहवालानुसार भारतीय इन्व्हेस्टर्सच्या तुलनेत ओव्हरसीज इन्व्हेस्टर्स रिलायन्सबाबत जास्त बुलिश आहेत. टेलिकॉम आणि रिटेल या दोन क्षेत्रांत रिलायन्स लवकरच आपले वर्चस्व प्रस्थापित करेल असा विश्वास या इन्व्हेस्टर्सना आहे. यासाठी त्यांनी तीन कारणे दिली आहेत.

१. रिलायन्सचा येऊ घातलेला स्वस्तातला स्मार्टफोन

२. फ्युचर ग्रुप डील (सध्या त्याला स्थगिती असेल तरीही)

३. ऑइल टू केमिकल बिसनेसमधील स्टेक अरामकोला विकण्याचा रिलायन्सचा प्लॅन

रिलायन्स येत्या अॅन्युअल जनरल मिटिंगमध्ये आपला स्वस्तातला स्मार्टफोन लाँच करू शकते. मध्यंतरी रिलायन्सच्या नेटवर्कमध्ये बरेच प्रॉब्लेम येत होते. यामुळे त्यांचे ग्राहक वाढण्याची गती कमी झाली.मात्र रिलायन्सने आता नवीन स्पेक्ट्रममध्ये गुंतवणूक केली आहे. त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. नवा स्मार्टफोन, स्पेक्ट्रम खरेदी या गोष्टींचा फायदा रिलायन्सला आपले ग्राहक वाढवण्यासाठी होऊ शकतो.

रिलायन्सने 3 वर्षांपूर्वी लाँच केलेल्या जिओ फोनच्या ग्राहकांचा ३ वर्षांचा करार संपतो आहे. त्यांना आपलाच स्मार्टफोन विकत घ्यायला रिलायन्स भाग पाडू शकते. आपल्या ग्राहकांना रिलायन्सने डेटा वापराची सवय लावली आहे. हे ग्राहक महिन्याला ६-७ जीबी डेटा सहज वापरतात. याचाच फायदा रिलायन्सला होणार आहे.

फ्युचर ग्रुप बरोबर झालेल्या डीलचा फायदा रिलायन्सला अमेझॉन आणि वॉलमार्ट यांच्याशी स्पर्धा करताना होऊ शकतो. फ्युचर ग्रुपबरोबरच्या डील मुळे रिलायन्स रिटेलचं नेटवर्क १२२०० स्टोअर्स, ७००० शहरे एवढं अवाढव्य झालं आहे. ग्रोसरी सेक्टरमध्ये रिलायन्सचा शेअर डिमार्टपेक्षा ४०% हुन जास्त आहे. फॅशन रिटेलमध्ये रिलायन्सचा वाटा ५% असून आदित्य बिर्ला फॅशनपेक्षा तो ५०% हुन जास्त आहे. इलेक्ट्रॉनिक्स रिटेल क्षेत्रात रिलायन्सचा महसूल ६ बिलियन डॉलर एवढा असून ते भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे. या डीलमुळे सुरुवातीच्या काळात रिलायन्स रिटेल आपले मार्जिन परसेंटेज थोडं कमी ठेवून जास्तीत जास्त ग्राहक आपल्याकडे आकर्षित करून घेऊ शकते.

रिलायन्स आणि अरामकोचे ऑइल टू केमिकल बिझनेस डील २०२२ मध्ये पूर्ण होऊ शकते.

गेल्या वर्षी जेव्हा रिलायन्सची रॅली सुरू होती तेव्हा अनेक रिटेलर्सने हा शेअर २२५०-२३०० रुपयांना घेतला. तिथून हा शेअर पडायला सुरुवात झाली. तो अगदी १८३० पर्यंत पडला. त्यामुळे हे रिटेलर्स काळजीत पडले होते. सध्या रिलायन्सचा शेअर १९८८ रुपयांवर आहे. जेफरीजच्या मते शेअरमध्ये वाढ होऊन तो साधारणपणे २६०० रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

टीप – हा जेफरीजच्या अहवालाचा गोषवारा आहे. हा शेअर विकत घ्यावा किंवा नाही हे प्रत्येकाने आपल्या आर्थिक सल्लागाराशी बोलून ठरवावे.

Comments are closed.