१८ महिन्यांत १७०% परतावा, लावणार का पैसा?
This fund has given 170% returns in only 18 months
ऑक्टोबर २०१ मध्ये आयसीसीआय प्रुडेन्शियल कमोडिटीज फंड (IPCF) लाँच झाला होता. या फंडाने गेल्या १२ महिन्यांत तब्बल १७२% टक्क्यांचा परतावा दिला आहे.
IPCF हा एक थिमॅटिक फंड आहे. हा फंड कमोडिटी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतो. अर्थात कमोडिटी सायकल जसे वर खाली होते तसे हे फंड कमीजास्त परतवा देत असतात. हा फंड पेपर, सिमेंट, मेटल्स, केमिकल्स, फर्टिलायझर्स अशा सेगमेंटमध्ये गुंतवणूक करतो. फंडाच्या एकूण गुंतवणुकीपैकी ८०% गुंतवणूक ही कमोडीटी स्टॉकमध्ये केली जाते.
ह्या फंडाने एवढा मोठा परतावा कसा दिला?IPCF हा फंड जेव्हा लाँच झाला तेव्हा मेटल सेक्टर अतिशय वाईट परफॉर्म करत होता. या सेक्टरमधील सगळ्या शेअर्सच्या किमती अतिशय कमी झाल्या होत्या. नेमकी हीच गोष्ट या फंडाचे मॅनेजर्स संकरन नरेन आणि ललित कुमार यांनी ओळखली. त्यांनी मेटल स्टॉकमध्ये भरपूर गुंतवणूक केली. जेव्हा मार्च २०२० मध्ये करोनामुळे मार्केटमध्ये पडझड झाली तेव्हा त्यांनी मेटल्समध्ये आणखी गुंतवणूक करत मेटल्समधील फंडाची एकूण गुंतवणूक ६०% पर्यंत नेली.
हिंदाल्को (१ वर्षात १८० टक्के परतावा), जिंदाल स्टील (३६५ टक्के परतावा), वेदांता (१८७ टक्के परतावा), स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (२७५ टक्के परतावा) या स्टॉकमुळे फंडाचा परफॉर्मन्स अतिशय चांगला झाला.
मार्च २०२१ अखेरीस या फंडाने गुंतवणूक केलेले टॉप १० स्टॉक
१. टाटा स्टील – ९.२%
२. जिंदाल स्टील – ६.९%
३. हिंदाल्को -६.६%
४. वेदांता – ६.३%
५. जिंदाल स्टेनलेस – ५.९%
६. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया – ५.८%
७. गोदावरी पॉवर अँड इस्पात – ५.५%
८. हिंदुस्थान ऑइल एक्सप्लोरेशन कंपनी – ५.२%
९. युपीएल लिमिटेड – ५.०%
१०. सारडा एनर्जी – ४.६%
Comments are closed.