कोरोनात बनावट नोटांची आकडेवारी वाढली, ‘इतकी’ आहे जप्त नोटांची रक्कम

The seizure of fake currency notes increased 191% in 2020, according to data from the National Crime Records Bureau.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या, क्राइम इन इंडिया 2020 च्या अहवालानुसार 2020 मध्ये 92 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 8,34,947 बनावट भारतीय चलन नोटा (FICN) जप्त करण्यात आल्या आहेत. 2019 मध्ये जप्त करण्यात आलेल्या 25 कोटी रुपयांच्या 2,87,404 नोटांच्या तुलनेत हे प्रमाण 190.5 टक्क्यांनी वाढले आहे.

कोविड कालावधीत बनावट नोटा जप्त करण्याच्या प्रकरणात 633 आरोपींसह 385 प्रकरणे नोंदवण्यात आली.

डेनॉमिनेशन्स

1000 रुपयांच्या बनावट नोटा सर्वाधिक (38 टक्के) जप्त केलेल्या नोटा होत्या, त्यानंतर 2,000 रुपये (29 टक्के) आणि 500 ​​रुपयांच्या नव्या नोटा (25 टक्के) होत्या. किमतीच्या बाबतीत, 2,000 रुपयांच्या नोटा एकूण जप्तीच्या 53 टक्के आहेत, त्यानंतर 1,000 च्या (35 टक्के) आहेत.

२०२० मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 699,495 एफआयसीएन जप्त केले, ज्याची किंमत 83.6 कोटी रुपये आहे. हे देशातील जप्त केलेल्या एकूण नोटांच्या 84 टक्के आणि मूल्यानुसार 91 टक्के आहे.

सर्वात जास्त बनावट नोटा जप्त केलेल्या इतर राज्यांमध्ये पश्चिम बंगाल (24,227), गुजरात (20,360), आंध्र प्रदेश (17,705) आणि उत्तर प्रदेश (17,078) यांचा समावेश आहे.

अशा जप्ती वाढण्याचे एक मुख्य कारण सुरक्षा एजन्सींकडून वाढलेली दक्षता आणि पाळत असू शकते.

एनसीआरबीच्या अहवालात, ‘word of caution’ असे म्हटले आहे: “गुन्हेगारीत वाढ आणि पोलिसांकडून गुन्हे नोंदणीत वाढ स्पष्टपणे दोन भिन्न गोष्टी आहेत. ही वस्तुस्थिती अनेकदा गोंधळलेली असते. यासाठी पोलिसांनी विविध उपक्रम राबवणे गरजेचे आहे.

रिझर्व्ह बँकेने 2020-21 च्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, “मागील वर्षाच्या तुलनेत 500 रुपयांच्या सापडलेल्या बनावट नोटांमध्ये 31 टक्के वाढ झाली आहे.” “तर इतर बनावट नोटांमध्ये घट झाली आहे.”

एकूणच, बँकिंग सिस्टीममध्ये सापडलेल्या बनावट नोटांमध्ये सुमारे 30 टक्क्यांची घट झाली आहे, 2019-20 मध्ये 2,96,695 नोटांपासून 2020-21 मध्ये 2,08,625 पर्यंत ती घट आहे. 2020-21 मध्ये बँकिंग क्षेत्रात सापडलेल्या एफआयसीएनपैकी 3.9 टक्के रिझर्व्ह बँकेमध्ये आणि 96 टक्के इतर बँकांमध्ये आढळून आले.

हिंदुस्तान टाइम्सने 20 सप्टेंबर रोजी दिलेल्या वृत्तानुसार , उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने एका महिलेला अटक केली, जी आंतरराष्ट्रीय बनावट नोटा रॅकेटची मास्टरमाईंड आहे, रविवारी तीला पश्चिम बंगालमधून अटक केली.

“बनावट नोटा बांगलादेशातून भारतात आणल्या गेल्या आणि मुमताज बानो (अटक केलेल्या महिलेच्या) निर्देशानुसार उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणाकडे पाठवण्यात आल्या. या राज्यांमध्ये पसरलेल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने तिने संपूर्ण ऑपरेशन चालवले, ”असे अहवालात म्हटले आहे.

Comments are closed.