दुसऱ्या दिवशीही पारस डिफेन्सची हवा सुरूच, ‘इतक्या’ वेळा केला गेला सबस्क्राइब
Retail investors seen bidding for Paras Defence shares in high numbers as the portion reserved for them was subscribed 40 times.
पारस डिफेन्स आणि स्पेस टेक्नॉलॉजीजच्या IPO ला जोरदार ओपनिंग दिसत आहे. बोलीच्या दुसऱ्या दिवशी 40.57 वेळा इश्यू सबस्क्राइब करण्यात आला आहे.
एक्सचेंजवर उपलब्ध असलेल्या सबस्क्रिप्शन डेटावरून दिसून आले की, गुंतवणूकदारांनी आयपीओच्या 71.40 लाख शेअर्सच्या तुलनेत 28.96कोटी इक्विटी शेअर्ससाठी बोली लावली आहे.
पारस डिफेन्स IPO हा 2021 मध्ये सुरू झालेला 42 वा IPO आहे. 23 सप्टेंबर रोजी बंद होणाऱ्या ह्या ऑफरसाठी किंमत बँड प्रति इक्विटी शेअर 165-175 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
रिटेल गुंतवणूकदारांसाठी ठेवलेला भाग 68.57 वेळा आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा 26.32 वेळा सबस्क्राइब करण्यात आला आहे. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांनी त्यांच्या राखीव भागाच्या 1.67 वेळा बोली लावली आहे.
21 सप्टेंबर रोजी पब्लिक इश्यूची 16.57 वेळा सबस्क्रिप्शन घेण्यात आल होत. तेव्हा रिटेल भाग 31.36 वेळा बुक करण्यात आला होता आणि 2,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त शेअरसाठी बोली लावली होती.
खाजगी क्षेत्रातील डिफेन्स आणि स्पेस प्रॉडक्ट आणि सोल्युशन्स कंपनीने आयपीओद्वारे 170.77 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यात 140.6 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आणि स्टेकहोल्डर ना विकून 30.2 कोटी रुपयांची विक्रीची ऑफर समाविष्ट आहे.
कंपनी ऑफरमधून मिळणारी निव्वळ कमाई उपकरणे खरेदी करण्यासाठी, कार्यरत भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, कर्ज परतफेड करण्यासाठी आणि जनरल कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरेल.
पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज डिफेन्स आणि स्पेस इंजिनिअरिंग प्रॉडक्ट आणि सोल्यूशन्सच्या विस्तृत श्रेणीची रचना, विकास, उत्पादन आणि चाचणी करण्यात गुंतलेली आहे.
“कंपनी किंमत-ते-कमाईवर प्रति शेअर 165-175 रुपयांच्या किंमत बँडवर इश्यू आणत आहे.भारतातील स्पेस आणि डिफेन्स क्षेत्रात ही कंपनी उत्पादने तयार करते. सरकारच्या “आत्मनिभर भारत” आणि “मेक इन इंडिया” च्या फायद्यासाठी कंपनी कार्यात आहे.
ब्रोकरेज म्हटले,” कंपनीची मजबूत ऑर्डर बुक पुढे चांगली कमाई दाखवते. म्हणून, सर्वकाही पाहता, आम्ही लिस्टिंग लाभ तसेच दीर्घकालीन मुदतीसाठी IPO सबस्क्राइब करण्याची नोट देतो.
आयपीओ वॉच आणि आयपीओ सेंट्रलच्या आकडेवारीनुसार, ग्रे मार्केटमध्ये पारस डिफेन्सचा शेअर प्रति शेअर 365-375 रुपये, 190-200 रुपयांचा प्रीमियम किंवा 108.6-114.3 टक्के वरच्या किमतीच्या बँडपेक्षा जास्त होता.
ग्रे मार्केट हे एक अनधिकृत ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे जिथे IPOमध्ये वाटप होण्याआधी आणि शेअर बाजारात लिस्टिंग करण्यापूर्वी शेअर्सची चांगली विक्री होते.
Comments are closed.