महिंद्रा द टायगर! 57 मिनिटात झाल्या तब्बल 25000 XUV 700 बूक

Fastest for any four-wheeler model, claims M&M

ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने सांगितले की, 7 ऑक्टोबर रोजी एका तासापेक्षा कमी कालावधीत एकूण 25,000 महिंद्रा XUV700 ची बुकिंग करण्यात आली. कंपनीने असा दावा केला आहे की, व्हेरिएंटनुसार ही संख्या जवळपास सहा महिन्यांच्या उत्पादनाच्या बरोबरीची आहे.

ऑटोमोटिव्ह विभागाचे सीईओ विजय नाकरा म्हणाले, “आम्ही आज सकाळी 10 वाजता बुकिंग ओपन केले होते. आम्ही सदर प्रतिसादाबद्दल कृतज्ञ आहोत, खरं तर आम्हाला आनंद झाला की आम्हाला पहिल्या 57 मिनिटांत तब्बल 25,000 XUV700 बुकिंग मिळाली आहेत”.

XUV700 च्या पुढील 25,000 युनिट्ससाठी 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता बुकिंग पुन्हा सुरू होईल. तेव्हा किंमतींमध्ये 50,000 रुपयांची वाढ केली जाईल.

पाच-सीटर बेसिक मॉडेल (पेट्रोल) ची एक्स-शोरूम किंमत आज 11.99 लाख रुपये होती, तर 8 ऑक्टोबर रोजी हा दर 12.49 लाख रुपयांपर्यंत वाढवला जाईल.

पुढील 25,000 XUV700 चा पुढील स्लॉट बुक केल्यानंतर, किंमती आणखी 50,000 रुपयांनी वाढतील.

SUV चे AX 7 लक्झरी (डिझेल, मॅन्युअल) ची किंमत 20.29 लाख रुपये आहे.

महिंद्रा अँड महिंद्राच्या मते, XUV700 साठी सोशल मीडियावर व्हिडिओंना एकूण 222 मिलियन व्ह्यूज मिळाले आणि वेबसाइट पेजला 6.48 मिलियन व्युव्हर्स मिळाले आहेत.

Comments are closed.