SBI आणि बच्चन पितापुत्रांत झाला करार, बँक देणार दरमहा 18.9 लाख

सुपरस्टार अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांनी वत्स आणि अमू बंगल्याचे तळमजले, स्टेट बँक ऑफ इंडियाला 15 वर्षाच्या करारानुसार भाड्याने दिले आहेत. जुहू येथील हे बंगले दरमहा 18.9 लाख रुपये भाडे याप्रमाणे करारबद्ध झाले. भाडेपट्टीचा करार 28 सप्टेंबर 2021 रोजी झाला. (Amitabh Bachchan and Abhishek Bachchan rent property to SBI)

दोन्ही बंगले जलसाच्या शेजारी आहेत, जिथे बच्चन कुटुंबीय सध्या राहतात. एसबीआयला भाड्याने दिलेली मालमत्ता 3,150 चौरस फूट क्षेत्रावर पसरलेली आहे. एकूण मालमत्तेसाठी 18.9 लाख रुपये भाडे घेतले जाईल आणि दर पाच वर्षांनी 25 टक्के भाडेवाढीचा करार यात समाविष्ट आहे. भाडे पाच वर्षांनंतर 23.6 लाख रुपये आणि 10 वर्षांनंतर 29.5 लाख रुपये असेल.

उपलब्ध कागदपत्रांनुसार यासाठी 2.26 कोटींचे डिपॉझिट बँकेने भरले आहे. मात्र याबाबत एसबीआय, अमिताभ बच्चन किंवा अभिषेक बच्चन यांच्या कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ही प्रॉपर्टी पूर्वी सिटी बँकेला भाडेतत्त्वावर देण्यात आला होता, असे ब्रोकरनी सांगितले.

स्थानिक ब्रोकर्सनी सांगितले की या भागात अनेक बँका आहेत ज्या HNI ग्राहकांना सेवा पुरवतात. अनेक सेलिब्रिटीज आणि बिझनेस टायकून या परिसरात राहतात. या ठिकाणी व्यावसायिक भाडे 450 रुपये प्रति चौरस फूट ते 650 रुपये प्रति चौरस फूट आहे. स्वतंत्र बंगल्यांची किंमत येथे 100 ते 200 कोटी रुपये आहे.

Zapkey.com द्वारे मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांनी या वर्षी मे महिन्यात अटलांटिस नावाच्या प्रकल्पात 31 कोटी रुपयांची 5,184 चौरस फुटांची मालमत्ता खरेदी केली. बच्चन यांनी डिसेंबर २०२० मध्ये मालमत्ता विकत घेतली पण त्यानी एप्रिल २०२१ मध्ये नोंदणी केली. ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र सरकारच्या २ टक्के स्टँप ड्यूटी माफीचा फायदा घेत त्यांनी 62 लाख रुपये स्टँप ड्युटी भरली, जी ३१ कोटी रुपयांचे २ टक्के आहे.

अभिनेता अभिषेक बच्चनने मुंबईतील एक अपार्टमेंट 45.75 कोटी रुपयांना विकले. 7,527 चौरस फूट पसरलेले सदर युनिट वरळीतील ओबेरॉय 360 वेस्ट प्रकल्पाच्या 37 व्या मजल्यावर आहे. सदर विक्री 10 ऑगस्ट 2021 रोजी नोंदणीकृत करण्यात आली होती. चार कारसाठी पार्किंग स्लॉट असलेले हे अपार्टमेंट अनुराग गोयल नावाच्या व्यक्तीला विकले गेले, ज्याने 2.28 कोटी रुपयांची स्टँप ड्यूटी भरली.

Comments are closed.