नमामी गंगे! ऑलिंपिक खेळाडूंच्या साहित्यांचा झाला लिलाव, मिळणारी रक्कम नमामी गंगेसाठी

The top picks at the e-auction in terms of the highest bid value were Neeraj Chopra’s javelin, which fetched Rs 1.5 core

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सादर केलेल्या प्रतिष्ठित भेटवस्तू आणि स्मृतीचिन्हांच्या ई-लिलावाच्या तिसऱ्या फेरीत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राच्या भाल्याला सर्वाधिक 1.5 कोटींची बोली लागली.

ई-लिलावाच्या तिसऱ्या फेरीसाठी एकूण 1,348 स्मृतिचिन्ह ठेवण्यात आले होते. टोकियो 2020 पॅरालिम्पिक गेमचे पदक विजेते आणि टोकियो 2020 ऑलिम्पिक गेमचे खेळाडू उपस्थित होते तसेच अयोध्या राम मंदिराचे मॉडेल हे याठिकाणी लक्षणीय होते.

लिस्तेड वस्तूंसाठी 8,600 पेक्षा जास्त बोली मिळाल्या आहेत, ज्यामध्ये सजावटीची गदा, स्टॅच्यू ऑफ युनिटीची प्रतिकृती,चरखा आणि एक घंटा यांना मूळ किंमतीच्या तुलनेत जास्त बोली मिळाल्या.

सरदार पटेल यांच्या शिल्पाला 140 बोली, 117 बोली लाकडी गणेशाला, 104 बोलींवर पुणे मेट्रो लाईनच स्मारक आणि 98 बोली विजय ज्योतीच स्मृतिचिन्ह यांना मिळाल्या.

नीरज चोप्राचा भाला, ई-लिलावात सर्वाधिक बोली खाऊन गेला, ज्याला 1.5 कोटी रुपये मिळाले, भवानी देवीचे ऑटोग्राफ केलेले फेन्सला 1.25 कोटी रुपये मिळाले, सुमित अँटिलचा भाला 1.002 कोटी, अंगवस्त्र टोकियो 2020 पॅरालिम्पिक टीम 1 कोटी रुपये आणि लोव्हलिना बोर्गोहेनचे बॉक्सिंग ग्लोव्हज 91 लाख रुपये अशा बोली लागल्या गेल्या.

www.pmmementos.gov.in या वेब पोर्टलद्वारे 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2021 पर्यंत ई-लिलाव आयोजित करण्यात आले होते. लिलावातून मिळणारी रक्कम ही गंगा नदीचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने नमामी गंगे मिशनला जाईल.

Comments are closed.