चुली पेटवाव्या की काय? परत एकदा वाढले घरगुती गॅसच्या किंमती

"At present prices, OMCs are absorbing Rs 100 per domestic cylinder," said an executive.

ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 6 ऑक्टोबर रोजी देशभरात घरगुती गॅसची किंमत प्रति सिलेंडर 15 रुपयांनी वाढवली आहे. 14.2 किलो विनाअनुदानित LPG सिलिंडरची किंमत आता 899.50 रुपये झाली आहे, जी दिल्लीमध्ये 884.50 रुपये होती.

तेल कंपन्यांकडून किंमतीच्या अधिसूचनेनुसार, अनुदानित आणि विनाअनुदानित दोन्ही एलपीजी किमतींचे दर वाढवण्यात आले. आंतरराष्ट्रीय इंधनाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे ही दरवाढ झाली आहे.

1 सप्टेंबर रोजी सर्व श्रेणीतील गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

केंद्र सरकार मालवाहतुकीच्या शुल्कामुळे निर्माण होणाऱ्या जास्तीच्या किमतीची भरपाई करण्यासाठी निवडक ग्राहकांना सबसिडी देते. प्रत्येक कुटुंब सरकारच्या सबसिडी योजनेअंतर्गत वर्षाला 12 सिलिंडरसाठी पात्र आहे. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सबसिडीची रक्कम दरमहा बदलत असते.

तेल कंपन्यांनी इंधन दरामध्ये पेट्रोल 30 पैशांनी आणि डिझेल 35 पैशांनी वाढवले. दिल्लीत पेट्रोल 102.94 रुपये आणि डिझेल 91.42 रुपये प्रति लीटर आहे.

दरम्यान, जागतिक बेंचमार्क ब्रेंट प्रति बॅरल 82.53 डॉलरवर गेला, तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट 78.87 डॉलर प्रति बॅरल वर गेला.

Comments are closed.