दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी ‘ह्या’ 3 ब्लूचिप फंडांकडे लक्ष द्या 

Large Cap funds can be an option if one is looking for conservative investment

AMFI च्या मासिक अहवालानुसार, लार्ज-कॅप फंडांची नेट ॲसेट अंडर मॅनेजमेंट 2,18,332.30 कोटी रुपये आहे आणि सप्टेंबर 2021 महिन्यासाठी सरासरी नेट ॲसेट अंडर मॅनेजमेंट 2,17,576.75 कोटी रुपये इतकी होती.

इक्विटी गुंतवणूकदार ब्लूचिप फंडांकडे गुंतवणुकीचे साधन म्हणून पाहू शकतात. ब्लूचिप फंड हे लार्ज-कॅप फंड आहेत ज्यांना SEBI ने त्यांच्या भांडवलापैकी किमान 80% भांडवल टॉप 100 कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणे बंधनकारक केले आहे. यानुसार गुंतवणुकदार या कमी जोखमीच्या लार्ज कॅप फंडांमध्ये SIP सुरू करू शकतात. खालील तीन ब्लूचिप फंडांना व्हॅल्यू रिसर्चकडून 5-स्टार रेटिंग मिळाले आहे आणि मागील वर्षात चांगले रिटर्न्स दिले आहेत.

1. ॲक्सिस ब्लूचिप फंड – डायरेक्ट ग्रोथ

हा एक ओपन-एंडेड इक्विटी फंड आहे जो मुख्यतः लार्ज-कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करतो.  2013 मध्ये फंड हाऊस अॅक्सिस म्युच्युअल फंडाने त्याची स्थापना केली होती. फंड हाउसच्या आकडेवारीनुसार, अॅक्सिस ब्लूचिप फंड डायरेक्ट प्लॅन-ग्रोथने मागील वर्षात 54.34 टक्के परतावा दिला. स्थापनेपासून फंडाने सरासरी वार्षिक परतावा 18.02 टक्के परतावा दिला आहे.

फंडाचा एक्सपेन्स रेशो 0.48 टक्के आहे. फंडाचे टॉप 5 इक्विटी अलोकेशन आर्थिक तंत्रज्ञान, सेवा, आरोग्यसेवा आणि बांधकाम क्षेत्रे आहेत. बजाज फायनान्स लि., एचडीएफसी बँक लि., इन्फोसिस लि., ICICI बँक लि., आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लि. या कंपन्या फंडाच्या टॉप पाच होल्डिंग्स आहेत. 22 ऑक्टोबर 2021 पर्यंत फंडाचे नेट ॲसेट व्हॅल्यू (NAV) 52.96 रू होते आणि 30 सप्टेंबर 2021 पर्यंत त्याची अॅसेट अंडर मॅनेजमेंट (AUM) 33,153.71 कोटी होती. या फंडात SIP ५०० रुपयांपासून सुरु करता येते.

2. कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी फंड – डायरेक्ट ग्रोथ

सदर योजना ही कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाची लार्ज-कॅप म्युच्युअल फंड योजना आहे. फंडाचा 1 वर्षाचा परतावा 56.01 टक्के आहे आणि सुरुवातीपासून फंडाने 16.50 टक्के सरासरी वार्षिक परतावा दिला आहे.

आर्थिक, तंत्रज्ञान, ऊर्जा, बांधकाम आणि आरोग्य सेवा क्षेत्रांचा फंडाच्या इक्विटी एक्सपोजरमध्ये समावेश आहे. इन्फोसिस ली., HDFC बँक लि., रिलायन्स इंडस्ट्रीज लि., ICICI बँक लि., आणि हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्प. लि. या फंडाच्या टॉप पाच होल्डिंग्स आहेत.

फंडाचा एक्सपेन्स रेशो 0.35% आणि एक्झिट लोड 1% आहे. 22 ऑक्टोबर 2021 पर्यंत, फंडाचे नेट ॲसेट व्हॅल्यू (NAV) 47.13 रू होते आणि 30 सप्टेंबर 2021 पर्यंत त्याची ॲसेट अंडर मॅनेजमेंट (AUM) 4701 कोटी होती. SIP 1000 रुपयांपासून सुरु करता येते.

3. मिराइ ॲसेट इमर्गिंग ब्लूचिप फंड – डायरेक्ट ग्रोथ

हा 2010 लाँच झालेला ओपन-एंडेड इक्विटी फंड आहे, जो लार्ज आणि मिड-कॅप दोन्ही कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. मार्केट कॅपिटलायझेशननुसार फंड आपल्या भांडवलापैकी 35-65 टक्के भांडवल टॉप 100 लार्ज-कॅप कंपन्यांमध्ये आणि 35-65 टक्के टॉप 250 मिड-कॅप कंपन्यांमध्ये गुंतवतो.

या फंडांचे रिटर्न्स गेल्या वर्षभरात 67.88 टक्के आहे. स्थापनेपासून सरासरी परतावा 26.11 टक्के आहे. फंडाचे टॉप 5 इक्विटी अलोकेशन आर्थिक, आरोग्यसेवा, तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, ऊर्जा क्षेत्रांमध्ये केले जाते. एचडीएफसी बँक लि., आयसीआयसीआय बँक लि., अ‍ॅक्सिस बँक लि., इन्फोसिस लि., आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या फंडाच्या टॉप पाच होल्डिंग्स आहेत. फंडाचा एक्सपेन्स रेशो 0.68% आहे आणि किमान SIP रु. 1000 पासून सुरू करता येऊ शकते. फंडाचे नेट ॲसेट व्हॅल्यू (NAV) 22 ऑक्टोबर 2021 रोजी 108.81 रू होते आणि त्याची ॲसेट अंडर मॅनेजमेंट (AUM) 21,263.17 कोटी होती.

Comments are closed.