आयपीओच्या आधी पेटीएमचा आणखी एक मोठा करार, वाचा सविस्तर

Swiss Re will invest 920 Cr in Paytm Insurance Arm

पेमेंट फर्म पेटीएमने दिलेल्या माहितीनूसार पेटीएम इन्श्युरटेक प्रायव्हेट लिमिटेड (PIT) ने स्विस री  कंपनीसोबत करार केला आहे. स्विस री (Swiss Re) ही जगातील आघाडीची रीइंश्युरन्स, इंश्युरन्स पुरवणारी कंपनी आहे. स्विस री पीआयटी मध्ये 920 कोटी रुपये गुंतवेल. एकूण 23 टक्के स्टेकसाठी ही गुंतवणूक केली जाईल. (Paytm)

जागतिक इंश्युरन्स मार्केटच्या तुलनेत भारतीय इंश्युरन्स मार्केटमध्ये मोठया प्रमाणात संधी आहे, असे कंपनीचे मत आहे. रेडसीरच्या डेटानुसार, नॉन लाईफ इंश्युरन्ससाठी ग्रॉस रिटन प्रिमियम FY2021 च्या 27 अब्ज डॉलर्सवरून FY2026 पर्यंत 50-60 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. पेटीएमसाठी सदर करारातून सध्याचा कस्टमर बेस आणि मर्चंट सिस्टीम वापरून मोठी पायरी गाठू शकते.

पेटीएमचे एमडी आणि सीईओ विजय शेखर शर्मा म्हणाले, “आम्ही एक प्रमुख धोरणात्मक गुंतवणूकदार म्हणून स्विस री सोबत पर्टनरशिप करत आहोत. स्वीस रीचा विमा क्षेत्रातील अनुभव आम्हाला फायद्याचा ठरेल.

याआधी पेटीएमने रहेजा क्युबीई ही जनरल इंश्युरन्स कंपनी आपल्या ताफ्यात समाविष्ट केली होती. असे असले तरी रहेजा क्युबीई आणि स्विस री या दोन्ही कंपन्यांसोबतच्या कराराला अजून मान्यता मिळणे बाकी आहे.

Comments are closed.