53124 कोटीच्या राईट इश्यूसाठी RIL चा फायनल कॉल – वाचा सविस्तर

रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) ने त्यांच्या 53,124 कोटी रुपयांच्या राइट इश्यूसाठी दुसऱ्या आणि फायनल कॉलच्या तारखा जाहीर केल्या आहेत. पार्टली पेड शेअर होल्ड करणाऱ्यांना 15 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत प्रति युनिट 628.5 रुपये द्यावे लागतील, असे कंपनीने म्हटले आहे. मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील प्रमोटर्सच्या ग्रुपला फायनल कॉलचा भाग म्हणून 13,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम भरावी लागेल.

RIL ने मे 2020 आणि मे 2021 मध्ये अशा दोन भागांत प्रत्येक शेअरहोल्डरकडून 628.5 रू जमा केले आहेत. फायनल कॉल पूर्ण झाल्यानंतर, पार्टली पेड शेअर्स फुली पेड शेअर्समध्ये रूपांतरित होतील. बुधवारी फुली पेड शेअर्स 2,633 रुपये प्रति शेअरवर बंद झाले, तर पार्टली पेड केलेले शेअर्स 1,986 रुपये प्रति शेअरवर बंद झाले. त्यामुळे पार्टली पेड असलेले शेअर्स 0.7 टक्के डिस्काउंटवर उपलब्ध आहेत. RIL ची प्रमोटर होल्डींग 50. 61 टक्के इतकी आहे.

नुकतीच रिलायन्स समूहाने रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. त्यांनी स्टर्लिंग अँड विल्सन सोलर या कंपनीत ४०% स्टेक विकत घेतला होता. याचा चांगला परिणाम दोन्ही कंपन्यांच्या शेअरवर दिसून आला. बातमी लिहितेवेळी रिलायन्सचा शेअर २५८७ रुपये तर स्टर्लिंग अँड विल्सन सोलरचा शेअर ४३२ रुपयांवर ट्रेड करत होता.

Comments are closed.