टेलिकॉम कंपन्या जोमात ग्राहक कोमात! दरवाढ ठरतेय डोकेदुखी

व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलनंतर, मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जिओने रविवारी पुढील महिन्यापासून प्रीपेड दरांमध्ये 21% पर्यंत वाढ करण्याची घोषणा केली. नवीन अनलिमिटेड प्लॅन 1 डिसेंबर पासून लागू होतील.

तिन्ही प्रमुख खाजगी टेलिकॉम ऑपरेटर्सनी आता ग्राहकांकडून अधिक रेव्हेन्यू मिळवण्यासाठी त्यांच्या किंमतीमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे.

टॅरिफ वाढीमध्ये जियोफोन प्लॅन, अनलिमिटेड प्लॅन आणि डेटा ॲड ऑन यांचा समावेश आहे.

जियोने निवेदनात म्हटले आहे की, “जागतिक स्तरावर सर्वात कमी किमतीत सर्वोत्तम गुणवत्तेची सेवा देण्याचे वचन जियो पाळत आहे आणि पाळत राहिल.

दरम्यान याअगोदर एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांनी देखील 20 ते 25 टक्के दरवाढ केली होती.

Comments are closed.