Coindcx IPO च्या तयारीत! सरकारच्या निर्णयावर एकूण भवितव्य अवलंबून

भारतातील पहिली क्रिप्टोकरन्सी युनिकॉर्न, CoinDCX आपला IPO आणण्याची तयारी करत आहे, असे फर्मचे सह-संस्थापक नीरज खंडेलवाल यांनी सांगितले. दरम्यान IPO चे एकूण गणित सरकारच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असेल.

बिटकॉइन, इथरियम, रिपल, डॉजकॉइन यांसारख्या क्रिप्टोकरन्सीची गुंतवणूकदारांमध्ये मोठी क्रेझ आहे. या क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवून गुंतवणूकदार रातोरात श्रीमंत होत आहेत. मात्र, आतापर्यंत भारतात किंवा कोणत्याही मोठ्या देशात याला मान्यता मिळालेली नाही. दरम्यान भारतात देखील ही क्रेझ दिसून येत आहे.

भारतातील पहिली क्रिप्टोकरन्सी युनिकॉर्न, CoinDCX आपला IPO आणण्याची तयारी करत आहे, असे फर्मचे सह-संस्थापक नीरज खंडेलवाल यांनी सांगितले. दरम्यान IPO चे एकूण गणित सरकारच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असेल.

ब्लूमबर्गशी बोलताना खंडेलवाल म्हणाले की, CoinDCX IPO मुळे भारताच्या ‘डिजिटल ॲसेट इंडस्ट्री ‘मध्ये आत्मविश्वास वाढेल.

ते म्हणाले,” जर सरकारने आम्हाला परवानगी दिली तर आम्ही IPO साठी नक्कीच प्रयत्न करू. ज्याप्रमाणे कॉइनबेस IPO ने क्रिप्टो मार्केटमध्ये खूप आत्मविश्वास निर्माण केला. त्याचप्रमाणे, आम्हालाही असाच विश्वास निर्माण करायचा आहे.

फेसबुकचे सह-संस्थापक एडुआर्डो सेव्हरिन यांच्या फंड B नेतृत्वाखालील फंडिंग राऊंडमध्ये 90 मिलियन डॉलर जमा झाल्यानंतर CoinDCX युनिकॉर्न बनली होती. Coinbase Ventures, Polychain Capital, Block.one, Jump Capital यांचीही फर्ममध्ये गुंतवणूक आहे.

दरम्यान खंडेलवाल म्हणाले की, IPO बाबत निर्णय हा पूर्णपणे कंपनी सरकारच्या नियमांवर अवलंबून राहील.

क्रिप्टोकरन्सी आणि रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल 2021 संसदेच्या चालू हिवाळी अधिवेशनात सादर करण्याची सरकारची योजना आहे.

दरम्यान RBI द्वारे काही खाजगी क्रिप्टोकरन्सी वगळता इतर सर्वांवर बंदी घालण्याचा विचार आहे.

Comments are closed.