ITC ची Mother Sparsh मध्ये 16% गुंतवणूक, जाणून घ्या गुंतवणुकीचे नेमके कारण
26 नोव्हेंबर रोजी ITC ने जाहीर केले की,ते D2C आयुर्वेदिक आणि नॅचरल पर्सनल केअर ब्रँड 'mother sparsh' मधील 16 टक्के स्टेक 20 कोटी रुपयांना शेअर सबस्क्रिप्शन डीलद्वारे विकत घेणार आहेत.
26 नोव्हेंबर रोजी ITC ने जाहीर केले की,ते D2C आयुर्वेदिक आणि नॅचरल पर्सनल केअर ब्रँड ‘mother sparsh’ मधील 16 टक्के स्टेक 20 कोटी रुपयांना शेअर सबस्क्रिप्शन डीलद्वारे विकत घेणार आहेत.
ITC ने फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, सदर अधिग्रहण D2C क्षेत्रात कंपनीसाठी फायद्याचे ठरेल.यामुळे कंपनी या क्षेत्रात रस दाखवत आहे.
ITC ने असे म्हटले आहे की, “सदर गुंतवणूक ही कंपनीचे अध्यक्ष संजीव पुरी यांनी मांडलेल्या ‘ITC नेक्स्ट’ धोरणाशी सुसंगत आहे.” D2C प्लॅटफॉर्म मजबूत करण्यावर देखील कंपनी लक्ष केंद्रित करत आहे.
Mother sparsh चे शेअर अधिग्रहण पूर्णतः डायल्यूट बेसिसवर केले जाईल आणि सदर अधिग्रहण कराराच्या अंमलबजावणीच्या तारखेपासून आठ महिन्यांच्या आत दोन टप्प्यांत पूर्ण करणे अपेक्षित आहे.
सदर अधिग्रहणविषयी बोलताना, ITC, पर्सनल केअर प्रॉडक्ट्स बिझनेसचे मुख्य कार्यकारी समीर सत्पथी म्हणाले,“आम्हाला विश्वास आहे की ही गुंतवणूक एक मोठी संधी उपलब्ध करते, जी नैसर्गिक आणि आयुर्वेदिक या दोन्ही क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करण्याच्या आमच्या प्रयत्नाशी मेळ खात आहे.
Comments are closed.