दारू पिऊ नका पण दारूवर पैसे नक्की लावा 

United Spirits has reduced it's debt to 556 Cr. Company might turn debt free in this year.

दारूपासून लांब रहा, दारूच्या आहारी जाऊ नका असे सल्ले आपण लहानापासून ऐकत आलेलो आहोत. बरेचजण त्यानुसार वागतात. अनेकांना दारूचा तिटकारा असतो. पण दारू प्यायली नाही तरी दारूवर लावलेला पैसा वाढणार असेल तर काय हरकत आहे? तयारी असेल तर युनायटेड स्पिरीट्स ही कंपनी आहे.

सगळ्यात आधी या कंपनीच्या नावाबाबत अनेकांचा होणारा घोळ दूर करू. हा लेख युनायटेड स्पिरीट्स लिमिटेड या कंपनीबद्दल आहे. मार्केटमध्ये या कंपनीचे लिस्टिंग MCDOWELL-N या नावाने आहे. कंपनी आता स्वतःचा उल्लेख दिएगो इंडिया या नावाने करते. दिएगो या दारूचे उत्पादन करणाऱ्या जगप्रसिद्ध कंपनीची दिएगो इंडिया ही सब्सिडीअरी आहे. कंपनीचे हेड ऑफिस बंगलोरमध्ये आहे. कंपनीचे प्रॉडक्ट्स अनेकांना माहित असतील. ज्यांना माहित नाहीत त्यांच्यासाठी. कंपनी जॉनी वॉकर, मॅकडोवेल नंबर १, रॉयल चॅलेंज, ब्लॅक लेबल, ब्लॅक डॉग, ब्लॅक अँड व्हाईट, सिग्नेचर, अँटिक्विटी ब्लू, डायरेक्टर्स स्पेशल, व्हॅट ६९ या लेबल्सच्या व्हिस्की, स्मर्नऑफ आणि सिरॉक वोडका, कॅप्टन मॉर्गन ही रम, आणि इतरही अनेक लेबल्स अंडर दारू बनवते.

कंपनीचा कारभार आत्तापर्यंत आनंद कृपालू हे बघत होते. आता जुलै २०२१ पासून हिना नागराजन ह्या कंपनीच्या सीईओ असणार आहेत. दिएगो इंडियामध्ये येण्याअगोदर नागराजन दिएगो आफ्रिकाच्या मॅनेजिंग डायरेक्टर होत्या. त्याआधी त्यांनी नेस्ले इंडिया, आयसीआय पेंट्स, मेरी के, रेकीट बेनकिसर या कंपन्यांमध्ये काम केले आहे.

गेली काही वर्षे कंपनी अतिशय वाईट परिस्थितीमध्ये होती. साधारण २००८ मध्ये दिएगोने युनायटेड स्पिरीट्सचे तेव्हाचे मालक विजय मल्ल्या यांच्यासोबत स्टेक विकत घेण्यासाठी बोलणी सुरु केली होती. सुरुवातीला मल्ल्या यांनी आपल्या स्टेकसाठी अर्थातच खूप मोठी किंमत मागितली होती. अखेरीस २०१४ मध्ये हा व्यवहार पूर्ण होऊन दिएगोने युनायटेड स्पिरीट्सवर जवळपास ५४% मालकी हक्क मिळवले. तेव्हापासून ते आजतगायत दिएगोने युनायटेड स्पिरीट्सचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. दिएगोने २०१४ साली कंपनी टेकओव्हर केली तेव्हा कंपनीचे एकूण डेट जवळपास ८३०० कोटी रुपये एवढे होते. कंपनीने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार हे डेट आता ५५६ कोटींपर्यंत खाली आले आहे. फक्त २०२०-२१ या एका आर्थिक वर्षात कंपनीने १५०० कोटी डेट कमी केले. पुढच्या तिमाहीत कदाचित कंपनी डेट फ्री होण्याची शक्यता आहे. कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो प्रत्येक वर्षी कमी होत चालला आहे.

कंपनीचा क्वार्टर टू क्वार्टर सेल्स पाहिला तर तो फ्लॅट दिसतोय. मात्र हिना नागराजन यांच्यासारख्या अग्रेसिव्ह लीडरला सीईओपदी बसवून कंपनीने आपले इरादे स्पष्ट केले आहेत. कंपनीच्या प्रॉफिटचा गेल्या तीन वर्षांचा CAGR म्हणजेच कंपाऊंडेड ऍन्युअल ग्रोथ रेट २६% तर गेल्या पाच वर्षांचा CAGR २१% एवढा आहे. प्रॉफिट मार्जिन सध्या कमी आहे हे कंपनी व्यवस्थापनाने त्यांच्या कॉन्फरन्स कॉलमध्ये मान्य केले. मात्र त्याचवेळी मार्जिन वाढवण्यासाठी योग्य पाऊले टाकली जातील याचेही संकेत दिले.

भारतात दरवर्षी साधारणपणे दीड कोटी लोक दारू पिण्यासाठीच कायद्याने ठरवून दिलेल्या वयाचे होतात. भारतात इथून पुढे बिअर, व्हिस्की सेमी इसेन्शियल कॅटेगरीमधील गोष्टी होणार आहेत. गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये दारू मिळवण्यासाठी लोकांनी केलेले प्रयत्न सगळ्यांनी पाहिलेत. याचा फायदा युनायटेड स्पिरीट्सला होऊ शकतो. त्यासाठी कंपनी निश्चितच प्रयत्न करेल.

कंपनीचा विकली चार्ट पाहता शेअर ६४५ च्या वर क्लोज झाला तर ब्रेकआऊट देण्याची शक्यता आहे.

Comments are closed.