बजाज ऑटोचे पहिल्या तिमाहीतील निकाल जाहीर, प्रॉफिट व मार्जिनमधे झालेत असे बदल

बजाज ऑटोने आर्थिक वर्ष २०२१-२२च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ३० जुन २०२१ रोजी या आर्थिक वर्षीची तिमाही संपली असून बजाजने जुलैच्या चौथ्या आठवड्यात याचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीला १०६१.२ कोटी रुपयांचा फायदा झाला असून गेल्या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत कंपनीला ५२८ तोटींचा नफा झाला होता. गेल्यावर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत यावेळी जवळपास ११५ टक्के जास्त नफा कंपनीला झाला आहे. असे असले तरीही पहिल्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा कंपनीचे निकाल थोडेसे कमी आले आहेत. याच काळात कंपनीने ११३७ कोटी रुपये फायद्याचे उद्धिष्ट ठेवले होते.

या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीची उलाढाल ७,३८६ कोटी राहिली असून हीच उलाढाल गेल्या आर्थिक वर्षात ३०७९.२ कोटी होती. कंपनीला या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ७,३५२ कोटी उलाढालीची अपेक्षा होती.

३० जून २०२१ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत कंपनीची EBITDA ११२० कोटी रुपये होती, जी आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीत ४०८.५ कोटी रुपये होती. पहिल्या तिमाहीत कंपनीच्या EBITDA आकडा ११७६ कोटी अपेक्षीत होता.

या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचे EBITDA मार्जीन १५.२% वर होते तर आर्थिक वर्ष २०२०-२१च्या पहिल्या तिमाहीत ते १३.३% होते. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या EBITDA मार्जीनचा अंदाज १६% होता. पहिल्या तिमाहीत कंपनीचा कर खर्च ३२१.५ कोटी रुपये होता. २०२०-२१ आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत हाच खर्च १५६.३ कोटी रुपये होता.

Comments are closed.