भरपूर कॉफी पिताय? मग कॉफीमध्ये पैसासुद्धा लावा
Increasing demand for the coffee can benefit CCL products in coming years
काही दिवसांपूर्वी आम्ही ब्रेकआऊट देऊ शकतील अशा शेअर्सच्या यादीत सीसीएल प्रॉडक्ट्स या शेअरचा समावेश केला होता. त्यानंतर त्या शेअरने चांगला परतावा दिला. आता या कंपनीबद्दल आणखी सविस्तर माहिती देणारा हा लेख.
सीसीएल प्रॉडक्ट्स ही कंपनी कॉफीचे प्रॉडक्शन, ट्रेडिंग आणि डिस्ट्रिब्युशन करते. कंपनी प्रामुख्याने भारत, व्हिएतनाम आणि स्विझर्लंड या देशात आपला व्यवसाय करते. कंपनीचे आंध्रप्रदेशात दोन तर व्हिएतनाम आणि स्विझर्लंडमध्ये प्रत्येकी एक प्रोडक्शन युनिट्स आहेत. आपले प्रॉडक्ट्स कंपनी ९० हून अधिक देशांतील कॉफी कंपन्यांना विकते. इन्स्टंट कॉफीचे प्रॉडक्शन करणारी आणि ती निर्यात करणारी सीसीएल प्रॉडक्ट्स ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. भारतातून निर्यात केलाय जाणाऱ्या एकूण इन्स्टंट कॉफीपैकी ५०% निर्यात एकटी सीसीएल प्रॉडक्टस कडून होते.
प्रॉडक्शन कपॅसिटी बद्दल बोलायचे झाले तर कंपनी २४,००० मेट्रिक टन स्प्रे ड्राइड कॉफी आणि ११,००० मेट्रिक टन फ्रीझ ड्राइड कॉफी बनवते. यासाठी कंपनीचे वर उल्लेख केलेल्या तीन देशांत कॉफी प्लांटेशन आहेत. भारतामध्ये कंपनी विविध कंपन्यांना बी२बी आणि बी२सी माध्यमातून इन्स्टंट कॉफी पुरवते. कंपनीचा डिस्टर्ब्युशन रिच साधारणपणे ९५,००० आऊटलेट एवढा आहे. दक्षिण भारतात कंपनीचा मार्केट शेअर ५% च्या आसपास आहे.
मार्च २०२१ अखेरीस संपलेल्या तिमाहीत कंपनीने ४९ कोटींचा नफा आणि ३३२ कोटींचा महसूल नोंदवला. या आर्थिक वर्षात कंपनीचा एकूण महसूल १२४६ कोटी तर नफा १८२ कोटी रुपये एवढा होता. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही ९% ची वाढ आहे. या आर्थिक वर्षात या आकड्यांमध्ये १०-१५% वाढ होईल असा विश्वास कंपनी व्यवस्थापनाला आहे. कंपनी व्हिएतनाममधील प्लॅन्टची कपॅसिटी ३५०० मेट्रिक टनाने वाढवणार आहे. हे एक्स्पान्शन २०२२ आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या कॅपेक्ससाठी कंपनीचे डेट वाढले ते येणाऱ्या काळात कमी करण्यावर कंपनीचा फोकस असेल.
कंपनीच्या स्पर्धक कंपन्या म्हणजे नेस्ले, टाटा कॉफी. या कंपन्यांकडून सीसीएलला बी२सी सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा उभी राहू शकते.
कंपनीचा बराचसा व्यवसाय हा निर्यातीवर अवलंबून आहे. त्यामुळे त्या त्या देशाची आयात निर्यात धोरणे, कॉफीवर लागणारी ड्युटी याचा कंपनीच्या प्रॉडक्ट्सच्या किमतीवर थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कंपनीच्या प्रॉफिट मार्जिनवर परिणाम होऊ शकतो.
कंपनीने अमेरिकेत नुकतेच ‘कोल्ड ब्रू कॉफी’ हे नवे प्रॉडक्ट लाँच केले. या प्रॉडक्टला चांगला प्रतिसाद मिळाला असून तेथील कस्टमर्सने २०२२ मधील आपल्या ऑर्डर्सचा आकडा डबल केला आहे. या बाबतीत सीसीएलला फर्स्ट मूव्हर ऍडव्हान्टेज मिळू शकेल. इतर कोणत्याही स्पर्धक कंपनीला असे प्रॉडक्ट डेव्हलप करण्यासाठी ३-४ वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळात अमेरिका मार्केटमध्ये कंपनी आपला व्यवसाय चांगला वाढवू शकते. जगभरात कॉफीचे सेवन म्हणजे पर कॅपिटा कंझप्शन येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. याचा कंपनीला फायदा होणार आहे.
या स्टॉकने काही दिवसांपूर्वी ब्रेकआउट दिला होता. हा ब्रेकआऊट सध्या रिटेस्ट होताना चार्टवर दिसते आहे. रिटेस्ट होऊन पुन्हा ब्रेकआऊट झाल्यावर स्टॉकमध्ये एन्ट्री करू शकता. गुंतवणूक करण्याआधी एकदा आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा जरूर करा.
Comments are closed.