अनलॉकचा लाभार्थी – एसएमएल इसुझु

SML Isuzu can the tide if all goes well

गेले वर्ष दीड वर्ष देशभरात शाळा कॉलेज बंद आहेत. याचा परिणाम शाळांसाठी वापरण्यात स्कुलबस सर्व्हिसवर सुद्धा झाला आहे. शाळाच बंद तर स्कुलबस तरी कशा चालणार? असे असले तरी आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. वेगवेगळ्या राज्य शासनांनी टप्प्याटप्प्याने शाळा, कॉलेज पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. या अनलॉक प्रक्रियेचा फायदा होऊ शकेल अशी एक कंपनी म्हणजे एसएमएल इसुझु.

आधी स्वराज माझदा या नावाने व्यवसाय करणारी ही कंपनी आता एसएमएल इसुझु या नावाने ओळखली जाते. सुमितोमो कॉर्पोरेशन आणि इसुझु मोटर्स यांचा कंपनीत अनुक्रमे ४४% आणि १५% स्टेक आहे. कंपनी प्रामुख्याने बस, ऍम्ब्युलन्स, पोलिस व्हॅन, टँकर्स यासारखे कमर्शियल व्हेईकल्स बनवते. भारताबरोबरच कंपनी आपले प्रॉडक्ट्स नेपाळ, बांगलादेश, केनिया, टांझानिया, घाना, जॉर्डन यांसारख्या देशांत विकते.

आत्ताच या कंपनीकडे लक्ष जाण्याचे कारण काय?

तर काल कंपनीच्या शेअरने ५०० रुपयांवरून २०% वर जात ६०१ रुपयांची पातळी गाठली. त्यानिमित्ताने कंपनीशी निगडित काही गोष्टींवर नजर टाकूयात.

स्कुल बस सेक्टरमध्ये कंपनीचा चांगला जम बसलेला आहे. आता शाळा पुन्हा सुरू होणार म्हटल्यावर त्याचा कंपनीच्या सेल्सवर चांगला परिणाम दिसू शकतो.

२०२१ च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने १६०७ गाड्या विकल्या. त्याआधीच्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने १५८५ गाड्या विकल्या होत्या. एप्रिल ते जून २०२१ या काळात कंपनीने ८१२ गाड्यांची विक्री केली. हाच आकडा एप्रिल ते जून २०२० या काळात २०२ एवढा होता. म्हणजे एकूण ३०२% ची वाढ झालेली आहे.

भारत सरकार ऑटो सेक्टरमध्ये लवकरच स्क्रॅपिंग पॉलिसी लागू करू शकते. याबाबत बरेच दिवस चर्चा सुरू आहे. यासाठीचे नियम सगळ्यात जास्त कडक कोणत्या गाड्यांसाठी असतील तर ते म्हणजे स्कुलबस आणि ऍम्ब्युलन्स. त्यामुळे सध्या ज्यांच्याकडे या गाड्या त्या रिप्लेस कराव्या लागणार. साहजिकच कंपनीला याचा फायदा होणार.

याशिवाय कंपनी काही स्पेशल पर्पज व्हेईकल्ससुद्धा बनवते. कोल्ड चेन्ससाठी लागणारे ट्रक, मायनींग आणि कन्स्ट्रक्शन सेगमेंटसाठी लागणारे टिपर ट्रक्स, लॉजीस्टिक्स सेक्टरमध्ये वापरात येणारे कंटेनर ट्रक्स यांच्या मागणीत येणाऱ्या काळात वाढ होऊ शकते.

कंपनीने आपला खर्च बराच आटोक्यात आणला आहे. गेल्यावर्षी सगळ्याच कंपन्यांसाठी अवघड परिस्थिती असताना कंपनीने आपल्या ऑपरेशन्समधून १५० कोटींचा कॅश फ्लो जनरेट केला होता. गेल्या तीन क्वार्टर्सपासून कंपनीच्या रेव्हेन्यू आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्समध्ये वाढ होते आहे. कंपनीच्या प्रमोटर्सचे ०% शेअर्स प्लेज केलेले आहेत.

गेल्या काही क्वार्टर्समध्ये कंपनीच्या सेल्स व्हॉल्युममध्ये वाढ होताना दिसते आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हा शेअर चांगली कामगिरी करू शकतो. सध्या ६०० रुपयांच्या दरम्यान असलेल्या या शेअरने २०१५ मध्ये १६५० रुपयांचा उच्चांक गाठला होता. सध्या हा शेअर बऱ्यापैकी स्वस्तात उपलब्ध आहे. शेअरचा मंथली चार्ट पाहिल्यास फॉलिंग ट्रेंड ब्रेक झाला आहे असे लक्षात येईल. त्यामुळे २-३ वर्षांसाठी गुंतवणूक म्हणून या शेअरचा विचार करायला हरकत नाही. अर्थात प्रत्येक क्वार्टरली रिझल्टनंतर गुंतवणुकीचा आढावा घेणे आवश्यक आहे.

Comments are closed.