बापरे! जुन महिन्यात ‘या’ कंपनीने विकल्यात तब्बल सव्वालाख चारचाकी

भारतात एप्रिल २०२१मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांचे जीव गेले. देशांत अनेक राज्यांत लॉकडाऊन लावावे लागले होते. या काळात लॉकडाऊनचा परिणाम हा अनेक क्षेत्रांवर झाला. त्यातील एक क्षेत्र म्हणजे ऑटोमोबाईल इंडस्ट्री. परंतू त्यानंतर मे महिन्यात पुन्हा एकदा हे क्षेत्र पुर्वपदावर येताना दिसले तर जुन महिन्यात तर विक्रमी चारचाकी विकण्याची कामगिरी काही कंपन्यांनी केली.

भारतातील कार उद्योगातील किंग समजल्या जाणाऱ्या मारुती सुझूकीने जुन महिन्यात तब्बल १ लाख २४ हजार २८० चारचाकी विकण्याचा पराक्रम केला आहे. गेल्यावर्षी जुन महिन्यात कंपनीच्या ५१ हजार २७४ चारचाकी विकल्या होत्या. त्यापेक्षा या वर्षी तब्बल १४२ टक्के गाड्या जास्त विकण्याचा पराक्रम कंपनीने केला आहे. यात १७ हजार ४३९ गाड्या या अल्टो व एस-प्रेसोच्या मिळून आहेत. गेल्यावर्षी जुन महिन्यात कंपनीच्या अल्टो व एस-प्रेसोच्या मिळून १० हजार ४५८ गाड्या विकल्या गेल्या होत्या. या दोन गाड्यांच्या विक्रीत तब्बल ६२ टक्क्यांची वाढ झाली आहे.

मारुती सुझूकीच्या कॉंपॅक्ट कार प्रकारात जसं की डिझायर, स्विफ्ट, सेलेरियो किंवा बलिनोमध्ये १५७.९ टक्क्यांची वाढ झाली आहे. जुन २०२० मध्ये २६ हजार ६९६ गाड्या या प्रकारातील कंपनीने विकल्या होत्या. त्याच जुन २०२१मध्ये ६८ हजार ८४९वर गेल्या आहेत. Ertiga, XL-6, Vitara Brezza आणि S-Cross मॉडेलमध्ये कंपनीच्या विक्रीत १८८.५ टक्क्यांची वाढ झाली असून जुन महिन्यात २८ हजार १७२ गाड्या विकल्या आहेत. गेल्यावर्षी याच मॉडेलच्या केवळ ९ हजार ७६४ गाड्या विकल्या गेल्या होत्या.

मारुती सुझूकीची मुख्य स्पर्धक असलेल्या ह्युंडाईच्या गाड्यांच्या विक्रीतही ८९.९ टक्क्यांची वाढ झाली असून जुन २०२१मध्ये कंपनीच्या ४० हजार ४९६ गाड्या विकल्या आहेत. जुन २०२०मध्ये ह्युंडाईने २१ हजार ३२० गाड्या विकल्या होत्या. मारुती सुझूकीने ह्युंडाईच्या जवळपास तीनपट जास्त गाड्या जुन २०२१मध्ये विकल्या आहेत.

महिंद्राने जुन २०२१मध्ये १६ हजार ९१३, टाटा मोटर्सने २४ हजार ११० तर एमजी मोटर्सने ३५५८ गाड्या विकल्या आहेत. दोन वर्षांपुर्वी भारतात दाखल झालेल्या कियाने १५ हजार १५, टोयोटाने ८ हजार ७९८, रेनॉल्टने ६ हजार १००, फोर्डने ६ हजार ९३६, होंडाने ४ हजार ७६७, निसानने ३५०३, फॉक्सवेगने १ हजार ६३३, फियाटने ७८९, स्कोडाने ७३४ तर सिट्रॉनने ४१ गाड्या विकल्या आहेत.

हेही वाचा-

दारू पिऊ नका पण दारूवर पैसे नक्की लावा 

आयपीओच आयपीओ – ग्लेनमार्क आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या आयपीओला सेबीची मान्यता 

आता मोबाईलवरून फाईल करा इन्कम टॅक्स रिटर्न

 

Comments are closed.