होमलोन आणि कारलोनसाठी विचार करताय? ‘ ही ‘ बँक आणतेय भन्नाट ऑफर

Bank of Baroda announces festive offers on retail loans.

भारत सरकारच्या मालकीच्या बँक ऑफ बडोदाने गुरुवारी फेस्टिवल सीजन मध्ये कर्जदारांसाठी अनेक ऑफर आणल्या आहेत. बँक ऑफ बडोदा होमलोन आणि कारलोनसाठी विद्यमान लागू दरामध्ये 0.25 टक्के सूट देत आहे.

बँकेच्या होमलोनचे दर 6.75 टक्के आणि कारलोनचे दर 7 टक्क्यापासून सुरू होतात.

बँकेने होमलोन वरील प्रोसेसिंग फी माफ केली आहे.

बँकेचे जनरल मॅनेजर एच.टी सोलंकी म्हणाले, “सणासुदीत कर्जावरील ऑफर सादर केल्यामुळे, आम्ही आमच्या ग्राहकांमध्ये उत्सवाचा उत्साह आणण्याचा प्रयत्न करत आहोत. बँकेच्या ग्राहकांना नवीन होमलोन आणि कारलोन घेण्यासाठी आकर्षक प्रस्ताव देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

ग्राहक होमलोन किंवा कारलोनसाठी मोबाइल बँकिंग ॲप्लिकेशन किंवा कंपनीची वेबसाइट वापरून अर्ज करू शकतात.

याअगोदर, स्टेट बँक ऑफ इंडियाने क्रेडिट स्कोअर लिंक्ड होम लोनसह 6.70 टक्क्यांपासून सुरू होणाऱ्या होमलोनची घोषणा केली होती.

Comments are closed.