महागाईचा फटका वाहन खरेदीदारांनाही,’ ह्या ‘ कंपनीने वाढवले दर

This is the third price hike for Hero MotoCorp; the company first increased prices in January 2021 and then in April 2021.

देशातील सर्वात मोठी टू व्हीलर मेकर कंपनी हिरो मोटोकॉर्प 20 सप्टेंबर 2021 पासून आपले एक्स-शोरूम दर वाढवणार आहे.

कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे, “इतर वाढत्या किमतीमुळे ही वाढ हळूहळू ऑफसेट करण्यात येईल.”

मोटारसायकल आणि स्कूटरच्या किंमतीतील वाढ ही 3,000 रुपयांच्या रेंजमध्ये असेल. एकूण वाढीचे प्रमाण मॉडेल आणि मार्केटवर अवलंबून असेल.

निवेदनात पुढे म्हटले आहे, “अनेक सकारात्मक गोष्टीसह, कंपनी आगामी फेस्टिवल सीजन मध्ये मोठया प्रमाणात विक्रीबाबत आशावादी आहे.”

हिरो मोटोकॉर्पने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत स्थानिक बाजारपेठेत 1.80 मिलियन युनिट्सची विक्री केली आहे, जी वर्षभरापूर्वीच्या कालावधीत विकल्या गेलेल्या 1.61 मिलियन युनिट्सपेक्षा सुमारे 12% वाढली आहे.

Comments are closed.