जिओफोन नेक्स्ट ला टक्कर देण्यासाठी एअरटेल लढवतेय ‘ही’ शक्कल!

Bharti Airtel is considering co-branded smartphone deals with handset makers ahead of the JioPhone Next launch

जिओफोन नेक्स्ट लाँच होण्याआधी भारती एअरटेल कंपनी आपल्या 2G ग्राहकांना रिंग-फेंस करण्याचा प्रयत्न करीत आहे. भारती एअरटेल स्मार्टफोनच्या किंमती कमी करण्यासाठी हँडसेट मेकर सोबत को-ब्रँडेड स्मार्टफोन डील आणि बंडल डेटा, व्हॉईस ऑफर बाबत चर्चा करत आहे.

सुनील मित्तल यांच्या मते, हे फक्त रिलायन्सला विरोध म्हणून घडत आहे. यामुळे जिओफोन नेक्स्ट आपल्या स्मार्टफोन ची किंमत कमी ठेवण्याची अपेक्षा आहे.

एअरटेलने हँडसेटसाठी प्रस्ताव मागितला आहे. लाव्हा, कार्बन आणि एचएमडी ग्लोबल ह्या उत्पादकांनी यात स्वारस्य दर्शविले आहे.

एअरटेल आपल्या जवळपास १२० मिलियन 2जी वापरकर्त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. जे जिओच्या 4G स्मार्टफोन नेटवर्ककडे आकर्षित करण्याच्या प्रयत्नांना वेसण घालू शकते. जिओ दावा करत आहे की जिओफोन नेक्स्ट-गुगलसह डिझाइन केलेला-जगातील सर्वात किफायतशीर स्मार्टफोन असेल.

एअरटेलने हँडसेट ब्रँडसह टाय-अपमध्ये स्मार्टफोनसाठी स्पेसिफिकेशन्स देखील ठरवली आहेत. परंतु जिओच्या किंमत आणि ऑफरची ते वाट पाहत आहे.

जिओने १० सप्टेंबर ऐवजी दिवाळीच्या सुमारास आपल्या स्मार्टफोनचे लाँचिंग पुढे ढकलले आहे.

एअरटेलने स्पेसिफिकेशन्सचे वर्गीकरण केले आहे परंतु त्यांच्यासाठी सबसिडी बाबत जुळणी माञ कठीण होईल अशी चिन्हे सध्या दिसत आहेत.

दरम्यान, काही इंडस्ट्री ट्रॅकर्स म्हणाले की कम्पोनेंटची कमतरता आणि किंमती वाढल्याने जिओ देऊ शकणाऱ्या सबसिडीच्या रकमेत बदल होऊ शकतो. असे म्हटले जात आहे की जिओ 4G स्मार्टफोन ३,५००-४,००० रू विक्रीचे लक्ष्य ठेवत आहे.

एअरटेल आपल्या फीचरफोन युजर्सना स्मार्टफोन ब्रँडसह 4 जी नेटवर्क मध्ये जिओने तयार केलेल्या बाजारातील गूढतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. कंपनीने यापूर्वी “मेरा पेहला स्मार्टफोन” उपक्रम सुरू केला होता, जो ती पुनरुज्जीवित करू शकते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, हँडसेट निर्माते एअरटेल टाय-अपसाठी फक्त अंतिम ऑफरवर अवलंबून असतील, कारण त्यांना “इन्व्हेंटरी रिस्क” टाळायची आहे.

एअरटेलचे सीईओ गोपाल विट्टल यांनी म्हटले आहे की, “हँडसेट सबसिडीचा मार्ग योग्य आहे, यावर त्यांचा विश्वास नाही. एअरटेलकडे “जियोफोन नेक्स्टला कसे सामोरे जावे?” याबाबत स्पष्टता आहे. कंपनीने ग्राहकांना कर्ज देण्याचे पर्याय उपलब्ध करण्यासाठी बँकांशी हातमिळवणी करण्याबरोबरच, हँडसेटसाठी OEM पायलट उपलब्ध केले आहेत.

“ही एक स्पर्धात्मक इंडस्ट्री आहे, आम्ही मार्केटप्लेसमध्ये चांगले मार्केटिंग ऑप्टिक्स आणि कॅपसीटी आणि लॉक प्लॅटफॉर्मच्या कॉम्बिनेशन मध्ये काय होते ते पाहू.”

संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगितले की कर्ज मिळणे सध्या अवघड झाले आहे कारण कर्जदार एअरटेलच्या एकूण ग्राहकांआधारे कर्ज देतील. बहुतेकांकडे क्रेडिट हिस्टरी नसेल आणि कर्जदारांकडे थकबाकी वसूल करण्यासाठी मजबूत यंत्रणा उपलब्ध नसेल. सल्लागार फर्म ॲनालिसिस मेसनचे अश्विंदर सेठी म्हणाले की, एंट्री लेव्हल स्मार्टफोनची किंमत-सुमारे ६,००० ते ७,००० असेल.

भारती एअरटेलने नमूद केले आहे की ते सबसिडी देण्याची शक्यता कमी आहे. परंतु ते OEM पार्टनरशीप करण्याची शक्यता आहे.

Comments are closed.