ओला मध्ये पण येणार आता “फक्त महिलाराज” पाहा काय आहे नेमकी आत्मनिर्भर महिला थिम!

Ola Electric chairman Bhavish Aggarwal said The factory will employ over 10,000 women, making it the world’s largest women-only factory.

ओलाचे को फाउंडर भावेश अग्रवाल यांनी सोमवारी सांगितले की, “त्यांची ओला इलेक्ट्रिक स्कूटर फॅक्टरी पूर्णपणे महिला चालवतील. तसेच यातून १०,००० पेक्षा जास्त महिलांना रोजगार मिळेल. ट्विट मध्ये ते म्हणाले, “आत्मनिर्भर भारतास आत्मनिर्भर महिलांची आवश्यकता आहे! ओला फ्युचर फॅक्टरी १०,००० हून जास्त महिलां द्वारे चालविली जाईल. हे सांगताना मला अभिमान वाटतो! ही जगातील सर्वात मोठी महिला फॅक्टरी असेल!

त्यांनी काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या महिलांच्या पहिल्या तुकडीचा एक व्हिडिओ देखील यावेळी शेअर केला.

एका ब्लॉगपोस्टमध्ये अग्रवाल म्हणाले की, कंपनीने या आठवड्यात पहिल्या बॅचचे स्वागत केले आहे.”पूर्ण क्षमतेने, फ्युचरफॅक्टरी १०,००० हून अधिक महिलांना रोजगार देईल. ज्यामुळे ती जगातील सर्वात मोठी केवळ महिलासाठी फॅक्टरी उभारणारी कंपनी बनेल.

ओलास अधिक सर्वसमावेशक करण्यासाठी आणि महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम आहे, असेही ते म्हणाले.

अग्रवाल म्हणाले की, कंपनीने महिलांना उत्पादन कौशल्यांमध्ये प्रशिक्षित करण्यासाठी आणि त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी लक्षणीय गुंतवणूक केली आहे. ओला फ्यूचरफॅक्टरीमध्ये तयार होणारे सगळे प्रॉडक्ट त्यांच्या देखरेखीखाली बनतीन.

“महिला सक्षम असल्यास त्यांचे आयुष्यच नव्हे तर त्यांचे कुटुंब आणि खरे तर संपूर्ण समाजाचे जीवन सुधारते. खरं तर, अभ्यासातून असे दिसून आले आहे की कामगार धोरणात महिलांना समानता प्रदान केल्यास भारताचा जीडीपी २७ टक्क्यांनी वाढू शकतो”. सध्या उत्पादनात महिलांचा सहभाग केवळ १२ टक्के इतका कमी आहे.

अग्रवाल पुढे म्हणाले, “भारत हे जगातील महत्वाचे उत्पादन केंद्र बनण्यासाठी, आपण महिला कामगारांसाठी अपस्कीलिंग आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले पाहिजे.”

ओलाने गेल्या वर्षी तामिळनाडूमध्ये पहिली इलेक्ट्रिक स्कूटर फॅक्टरी उभारण्यासाठी २,४०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. जगातील सर्वात मोठी स्कूटर उत्पादक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंपनीने तेव्हा सांगितले होते की, सुरुवातीला ते १० लाख वार्षिक उत्पादन क्षमतेने प्रवास सुरू करतील आणि नंतर मागणीनुसार पहिल्या टप्प्यात ते २० लाखांपर्यंत उत्पादन वाढवतील.

ओला इलेक्ट्रिकने दावा केला होता की,”त्यांच्या प्लांटची एकूण वार्षिक क्षमता एक कोटी युनिट असेल, “जे जगातील एकूण टू व्हीलर उत्पादनाच्या १५ टक्के आहे”.

कंपनीने १५ ऑगस्ट रोजी आपली ओला एस1 इलेक्ट्रिक स्कूटर, एस1 आणि एस1 प्रो या दोन प्रकारांमध्ये अनुक्रमे ९९,९९९ आणि १,२९,९९९ रुपये मध्ये विक्रीस आणली होती.

८ सप्टेंबर रोजी विक्री सुरू होणार होती, परंतू काही तांत्रिक अडचणी” आल्यामुळे विक्री प्रक्रिया १५ आठवड्यांपर्यंत पुढे ढकलली गेली.

Comments are closed.