झोमॅटोच्या फाऊंडर्समध्ये वादाची ठिणगी? एकाने दिला राजीनामा

Zomato co-founder Gaurav Gupta exits company

सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार झोमॅटो फूड टेक प्लॅटफॉर्मचे सीओओ गौरव गुप्ता यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

२०१५ साली झोमॅटो मध्ये सामील झालेल्या गुप्ता यांची २०१८ मध्ये सीओओ आणि २०१९ मध्ये संस्थापक म्हणून पदोन्नती झाली होती. आयपीओच्या काळात ते कंपनीचा प्रमुख चेहरा होते. गुंतवणूकदार आणि माध्यमांशी चर्चा करण्यात ते आघाडीवर होते.

झोमॅटोने ग्रोसरी डिलिव्हरी आणि न्युट्रास्युटिकल बिझनेस मधून बाहेर पडल्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला.

डेवेलपमेंटशी संबंधीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल आणि गौरव गुप्ता यांच्यात काही काळापूर्वी मतभेद झाल्याने ही एक्झिट घेण्यात आली आहे.

गुप्ता यांनी सुरू केलेले व्यवसाय ज्यात ग्रोसरी आणि न्यूट्रास्युटिकल्स यांचा समावेश आहे परंतू सध्याच्या कालावधीत ते संघर्ष करत होते त्यामुळे बंद करावे लागले. शिवाय, त्यांच्या नेतृत्वाखाली परदेशात कंपनीचा विस्तार देखील यशस्वी झाला नाही.

सूत्रांनुसार गुप्ता यांनी त्यांच्या मेलमध्ये म्हटले आहे की ते झोमॅटोमध्ये ६ वर्ष काम केल्यानंतर “एक नवीन अध्याय सुरू करत आहेत”.

त्यांची ग्रोसरी वितरण सेवा बंद केल्यानंतर झोमॅटोने न्युट्रास्युटिकल व्यवसायाही बंद केला. झोमॅटोने गेल्या वर्षी हेल्थ आणि फिटनेस उत्पादनांद्वारे न्यूट्रास्युटिकल व्यवसायात प्रवेश केला होता.

कंपनीने अशा वेळी आपला हा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे जेव्हा सरकार देशातील व्यवसायांसाठी कठोर नियम करण्याचा प्रयत्न करीत आहे.

न्यूट्रास्युटिकल्सची व्याख्या ही अन्ना संबंधित उत्पादन म्हणून केली जाते. जी वैद्यकीय किंवा हेल्थ क्षेत्रात उपयुक्त असते. कोविडनंतर, भारतीयांमध्ये हेल्दी फूड खाण्यात वाढ झाली आहे.

ह्या सेगमेंटमध्ये मोठी संधी आहे असे ठरवून झोमॅटोने ह्या सेगमेंटमध्ये प्रवेश केला आणि पाच वर्षांसाठी या विभागाचे प्रमुख म्हणून गुप्ता यांना पुढे केले होते.

“हा व्यवसाय भविष्यात झोमॅटोसाठी फायदेशीर ठरू शकतो,” असे गुप्ता यांनी गेल्या वर्षी सांगितले होते.

दरम्यान, जुलैमध्ये लिस्टिंग झालेल्या झोमॅटोने ३० जून २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीत ३५६ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला आहे, जो मागील आर्थिक वर्षात ह्याच कालावधीत ९९.८ कोटी रुपये होता.

प्रस्तुत तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न ९१६ कोटी रुपये होते. मागिल वर्षीच्या २८३.५ कोटी रुपयांच्या तुलनेत ही मोठी झेप होती.

Comments are closed.