‘हिट पासून गूड नाईट पर्यंत’ ब्रँड पुरवणारी ही कंपनी वाढवतेय आपला विस्तार!

FMCG giant Godrej Consumer Products expects to achieve double-digit growth in the 2022 financial year

कंपनी ऑफिसियल कडून मिळालेल्या माहितीनुसार, एफएमसीजी कंपनी गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल) चालू आर्थिक वर्षात दुहेरी आकड्यात वाढीचा विचार करत आहे.

गोदरेज ग्रूपच्या फर्मने ई-कॉमर्ससारख्या नवीन युगात अनेक उपक्रम घेतले आहेत. जसे की केमिस्ट आणि फार्मसी स्टोअर्स जे कोवीडनंतर एफएमसीजी उत्पादने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण टचपॉईंट म्हणून उदयास आले.

व्यापक आणि वैयक्तिक स्वरूपात काळजी घेणारी गोदरेज कंपनी ग्रामीण भागातही आपला विस्तार वाढवत आहे. कंपनीने तेथे ३० टक्के नवीन स्टॉकिस्ट जोडले आहेत.

जीसीपीएलचे सीईओ सुनील कटारिया म्हणाले, “इतर कंपन्यांप्रमाणे, जीसीपीएलनेही ई-कॉमर्स चॅनल्सद्वारे विक्रीत वाढ केली आहे. आता पुढील २-३ वर्षांत ऑनलाइन विक्री एकूण विक्रीमध्ये १० टक्के योगदान देण्याची अपेक्षा आहे”.

जीसीपीएलने या आर्थिक वर्षातील दुसऱ्या लाटेचा प्रभाव असूनही, चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत चांगली व्हॉल्यूम आधारित वाढ नोंदवली. कंपनीची एकूण निव्वळ विक्री २३.८८ टक्क्यांनी वाढून २,८६२.८३ कोटी रुपये झाली आहे.

जीसीपीएलच्या ग्रोथबद्दल विचारले असता कटारिया यांनी पीटीआयला सांगितले, “जर सगळ स्थिर राहिल आणि तिसरी लाट आली किंवा सौम्य लाट आली तर आम्ही या वर्षी दुहेरी मूल्य वाढवू. ”

“आम्ही अशी अपेक्षा करतो की ग्रोथ सर्व क्षेत्रामध्ये पसरली पाहिजे. पर्सनल वॉश आणि हायजीन चांगली कामगिरी करत आहेत. घरगुती कीटकनाशकावर आमचा मुख्य भर असेल.”

HI सेगमेंटमध्ये हिट आणि गुड नाईट सारख्या शक्तिशाली ब्रॅण्ड्स असलेल्या कंपनीला कोविडनंतरच्या जगात संधीची अपेक्षा आहे.

HI सेगमेंटमध्ये कंपनीची आणखी काही नवीन उत्पादने लाँच करण्याची योजना आहे.

कटारिया पुढे म्हणाले, “आम्हाला काही क्षेत्रांत तोटा सहन करावा लागला होता. आता ते क्षेत्र देखील योग्य रीतीने पुनरागमन करतील.”

तथापि, कटारिया यांनी कोवीड बाबत अनिश्चितता आणि संभाव्य तिसरी लाट याबद्दल सावधगिरी बाळगली असल्याचे म्हटले.

दरम्यान, कटारिया यांनी असेही म्हटले आहे की साथीचे रोग कमी होत असताना, हेल्थ आणि हायजीन विभागात काही बदल देखील झाले आहेत. ज्यामध्ये गोदरेज ग्रुप फर्मने कोविड नंतर नवीन उत्पादने लाँच करून भर घातली आहे.

परंतु हायजीनची काही मूलभूत उत्पादने आहेत जी चांगली वाढ करत राहतील. उदाहरणार्थ, हात धुणे ही एक सवय आहे आणि ती राहणार आहे ते कोविड लाटेदरम्यान अजून वाढले.

गोदरेज प्रोटेक्ट मॅजिक हँड वॉश सारखी जीसीपीएल ची उत्पादने बरीच चांगली वाढ करत आहेत आणि ती अजून मजबूत होतील.

जीसीपीएल ई-कॉमर्स वाहिन्यांना टॅप करण्यासाठी देखील काम करत आहे. जे आता कंपनीच्या एकूण विक्रीच्या सुमारे ५ टक्के योगदान देतात कारण कोवीडनंतर ऑनलाइन विक्रीकडे कल निर्माण होत आहे.

कटारिया म्हणाले, “आम्ही ई-कॉमर्स हा एक वेगळा व्यवसाय निर्माण केला आहे.आमचा विश्वास आहे की ई-कॉमर्समध्ये केवळ ग्राहकांना सेवा देण्याची क्षमता नाही तर अनेक उत्पादने तयार करण्याची देखील शक्यता आहे.जी डिजिटल-फर्स्ट असू शकतात”.

ई-कॉमर्स विक्रीच्या उद्दिष्टाबाबत ते म्हणाले, “पुढील तीन वर्षांत ह्या व्यवसायात ८ ते १० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.”

रुरल सेल्सबद्दल बोलताना कटारिया म्हणाले की, कंपनीने तेथे स्टॉकिस्टचे जाळे ३० टक्क्यांनी वाढवले ​​आहे, जिथे आता १३,००० रुरल डिस्ट्रिबिटर्स आहेत.

“त्याचप्रमाणे, आम्ही हायजीन प्रोडक्ट देखील लॉन्च केली आहेत. आम्ही फार्मसी आणि केमिस्ट चॅनेलसाठी एक स्वतंत्र नेटवर्क देखील तयार केले आहे.

Comments are closed.