बिग बुलची नवी चाल, ‘ह्या ‘ कंपन्यांतील स्टेक केले कमी
Rakesh Jhunjhunwala has reduced his stakes in The Mandhana Retail Ventures, TARC and Fortis Healthcare.
भारताचे नावाजलेले गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी मल्टी कमोडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया (एमसीएक्स) मधून एक्झिट घेतली आहे, तसेच पोर्टफोलिओमधील इतर तीन कंपन्यांमध्येसुद्धा त्यांनी स्टेक कमी केले आहेत.
सप्टेंबर 2021 मध्ये संपलेल्या तिमाहीनंतर प्राप्त झालेल्या ताज्या शेअरहोल्डिंग डेटानुसार MCX च्या प्रमुख स्टेकहोल्डरमध्ये झुनझुनवाला यांचा समावेश नाही. नियमांनुसार, कंपन्यांना एक टक्क्यापेक्षा कमी स्टेक असलेल्या स्टेकहोल्डरचे नाव उघड करण्याची आवश्यकता नसते.
झुनझुनवाला यांच्याकडे जून तिमाहीपर्यंत MCX चे 25 लाख शेअर्स होते. मात्र आता त्यांनी हा स्टेक एक टक्क्यापेक्षा कमी केली आहे. त्यांनी इतर तीन कंपन्यांतील आपला स्टेकदेखील कमी केला आहे. मंधाना रिटेल व्हेंचर्स, टीएआरसी आणि फोर्टिस हेल्थकेअर या त्या तीन कंपन्या आहेत.
7 ऑक्टोबर रोजी झुनझुनवाला यांनी सांगीतले की, त्यांनी मंधाना रिटेलमधील 8.5 लाख शेअर्स ऑफलोड केले आहेत , ज्यामुळे कंपनीतील त्यांचा स्टेक 2.4 टक्क्यांवर आला आहे. 26 सप्टेंबरपर्यंत त्यांच्याकडे मंधाना रिटेलचे 17,87,900 इक्विटी शेअर्स होते.
झुनझुनवाला यांच्याकडे जून तिमाहीपर्यंत टीएआरसीचे 3.39 टक्के स्टेक होते. शेअरहोल्डिंग आकडेवारीनुसार ते 30 सप्टेंबरपर्यंत 1.59 टक्के करण्यात आले आहे. फोर्टिस हेल्थकेअरमध्ये, त्यांनी 4.31 टक्क्यांवरून 4.23 टक्के स्टेक कमी केला आहे.
फार्मा मेजर ल्युपिन लिमिटेडने केलेल्या नुकत्याच दाखल केलेल्या शेअरहोल्डिंग मध्ये झुनझुनवाला यांचे नाव नव्हते. सध्या अनेक कंपन्यांमध्ये शेअर्सची ऑफलोडिंग सुरु असूनही, झुनझुनवाला यांनी इंडियन हॉटेल्स, टाटा कम्युनिकेशन्स, मॅन इन्फ्रा कंस्ट्रक्शन, एनसीसी, ओरिएंट सिमेंट, वोक्हार्ट, ॲग्रो टेक फूड्स आणि ॲप्टेक या आठ शेअर्समध्ये आपली होल्डिंग्स तशीच ठेवली आहे.
Comments are closed.