उत्तराखंडमध्ये पाऊस थांबेना, सततच्या पावसाची झळ ऑटोमोबाईल सेक्टरला, वाचा सविस्तर

Bajaj Auto, Ashok Leyland and Tata Motors have shut down production at their Pantnagar plants due to severe rain

उत्तराखंडमधील सततच्या पावसामुळे पंतनगरमधील ऑटोमोटिव्ह आणि कंपोनंट उत्पादक कारखान्यांचे काम थांबले आहे. पावसामुळे तेथे आतापर्यंत किमान 34 जणांचा बळी गेला आहे. एनडीआरएफने रुद्रपूरमधील जलमय भागात बचाव कार्य केले, तर भारतीय हवाई दलाने पंतनगर येथे पूर मदत कार्यासाठी तीन ध्रुव हेलिकॉप्टर पाठवले.

बजाज ऑटो आणि अशोक लेलँड यांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या पंतनगर प्लांटमधील उत्पादन बंद केले आहे. तर टाटा मोटर्सने देखील 19 ऑक्टोबर रोजी उत्पादन बंद केले होते. मात्र २० ऑक्टोबर रोजी त्यांनी पुन्हा आपला प्लांट सुरु केला.

बजाज ऑटो पंतनगर प्लांटमध्ये सीटी, प्लॅटिना आणि पल्सर ब्रँडची मोटरसायकल बनवते, तर अशोक लेलँड येथे ट्रक तयार करतात. टाटा मोटर्स आपल्या पंतनगर प्लांटमधून मिनी ट्रकसह लहान व्यावसायिक वाहने बनवते.

बजाज ऑटोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पावसामुळे कारखान्यात उत्पादन थांबवावे लागत आहे. “उत्पादन कधी सुरु येईल हे सांगणे कठीण आहे. प्लांटचे कोणतेही नुकसान झाले नाही आणि आमचे सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत.”

अशोक लेलँडच्या प्रवक्त्यानेही सांगितले की, “आज संततधार पावसामुळे कंपनीने उत्पादन बंद केले आहे. दरम्यान उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले आहे. अजूनही सर्वत्र पूर मोठया प्रमाणात आहे.”

उत्तराखंडमध्ये हिरो मोटोकॉर्प आणि महिंद्रा अँड महिंद्रा या दोन अन्य प्रमुख ऑटोमोटिव्ह ब्रॅण्डचे उत्पादन कारखाने आहेत, मात्र त्यांचे प्रोजेक्ट हरिद्वार येथे असल्याने त्यांना पावसाचा जास्त फटका बसला नाही. हिरो मोटोकॉर्पच्या प्रवक्त्याने सांगितले, “आमच्या उत्पादन कार्यांवर पावसाचा परिणाम झालेला नाही आणि उत्पादन सुरू आहे.”

Comments are closed.