HUL चा Q2 रिझल्ट आला, वाचा कुठं झाला प्रॉफिट तर कुठं झाला लॉस

HUL Q2 results: On a sequential basis, the profit after tax (PAT) grew 6% from ₹2,061 crore in the June quarter

हिंदुस्थान युनिलिव्हरने सप्टेंबर तिमाहीत 2,187 कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 2,009 कोटीच्या तुलनेत 9% नी वाढला आहे.

अनुक्रमिक आधारावर, पीएटी जून तिमाहीत 2,061 कोटी वरून 6% वाढला.

कंपनीचे ऑपरेशनमधून उत्पन्न 11% वाढून 12,724 कोटी झाले जे गेल्यावर्षी 11,442 कोटी होते.

मंगळवारी, HUL ची स्क्रिप दुपारच्या डील्समध्ये जवळजवळ 2% खाली होती, रिझल्ट घोषित झाल्यानंतर, एनएसईवर ती 2,604 रू.वर पोहचली.

संजीव मेहता, (HUL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक) म्हणाले,”सप्टेंबर तिमाहीत ट्रेडिंगमध्ये सुधारणा झाली, तरीही इनपुट कॉस्ट चलनवाढ आणि ग्राहकांची कमतरता झाल्यामुळे हे वर्ष आव्हानात्मक राहिले. या पार्श्वभूमीवर, आम्ही मजबूत कामगिरी केली आहे आणि नफा वाढवला आहे.”

व्याज, कर, आणि EBITDA सोडून कंपनीची एकूण कमाई 3,132 कोटी झाली आणि मार्जिन 25% वर राहिला.

HUL च्या देशांतर्गत ग्राहक व्यवसायाने सप्टेंबर तिमाहीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 11% वाढ नोंदवली.

कंपनीने 31 मार्च 2022 ला संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रति इक्विटी शेअर 15 रू चे इंटरीम डिविडेंड देखील घोषित केले आहे.

ते म्हणाले, “अनिश्चितता आणि वाढता इनपुट खर्च यांच्या दरम्यान आम्ही सातत्यपूर्ण, स्पर्धात्मक, फायदेशीर आणि जबाबदार वाढीवर ठामपणे लक्ष केंद्रित करत आहोत.”

कंपनीचा होम केअर बिसणेस 15% वाढला. हाऊसहॉल्ड केअर सुद्धा चांगली कामगिरी करत आहेत. लिक्विड्स आणि फॅब्रिक सेन्सेशन्सनी देखील चांगली कामगिरी केली आहे.

सौदर्य प्रसाधनानी देखील 10% वाढ नोंदवली आहे, तर फूड आणि रीफ्रेशमेंट व्यवसायात मागील वर्षाच्या तुलनात्मक तुलनेत 7% वाढ दिसून आली.

मंगळवारी, HUL ची स्क्रिप दुपारच्या डीलमध्ये जवळजवळ 2% खाली होती, रिझल्टनंतर, NSE वर ती 2,604 रू वर होती.

Comments are closed.