‘ ही ‘ EV कंपनी 10 नोव्हेंबरपासून सुरू करणार टेस्ट राईड, असा आहे प्लॅन

On the same day it begins offering test rides, Ola Electric will start accepting the full payment for its S1 and S1 Pro electric scooters; promises delivery timelines will be unchanged.

ओला इलेक्ट्रिकने ओला S1 आणि S1 प्रो च्या खरेदीदारांना सूचित केले आहे की, 10 नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने गाड्यांची टेस्ट राईड सुरू होईल. ओलाने फायनल पेमेंटची अंतिम तारीख देखील पुढे ढकलली आहे.

अंतिम पेमेंटची तारीख देखील पुढे ढकलण्यात आली आहे, जी 18 ऑक्टोबर होती. दरम्यान ओला इलेक्ट्रिकने डिलीव्हरीची तारीख मात्र तीच ठेवली आहे.ओला S1 आणि S1 Pro ची डिलिव्हरी नोव्हेंबरच्या दुसऱ्या सहामाहीत सुरू होण्याची शक्यता आहे.

15 ते 16 सप्टेंबर दरम्यान दोन दिवस कंपनीची परचेस विंडो खुली होती. ओला इलेक्ट्रिकने 1,100 कोटी रुपयांच्या स्कूटर विकल्याचा दावा केला आहे. तसेच एक लाख युनिट्सपेक्षा जास्त बुकिंग सध्या आहेत. परचेस विंडो पुढील महिन्यात फ्रेश ऑर्डर पुन्हा होईल, परंतु दर वाढण्याची शक्यता आहे.

ओला इलेक्ट्रिक सध्या तामिळनाडूमधील त्यांच्या फ्यूचरफॅक्टरीमध्ये प्रोडक्ट ट्रायल घेण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ओला इलेक्ट्रिकने 200 मिलियन डॉलर निधी उभारण्याची तयारी केली आहे.

सदर कारखान्यात जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादन सुविधा उपलब्ध आहे, जी एकूण 500 एकर जागेत पसरलेली आहे. ओलाकडे पहिल्या टप्प्यात दोन मिलियन वाहनांची वार्षिक उत्पादन क्षमता आहे आणि पुढील वर्षी ही संख्या दहा लाख वाहनांपर्यंत वाढेल. त्या वेळी, ओला इलेक्ट्रिकचा अंदाज आहे की ते दर दोन सेकंदात दहा उत्पादन लाइनमधून नवीन दुचाकी तयार करतील.

Comments are closed.