गूगल पिक्सेल काही क्षणात होणार लाँच, ‘ हे ‘असतील संभाव्य फिचर्स

google to launch pixel 6 and pixel 6 pro

गुगलने आपल्या नवीन पिक्सेल 6 सीरीजचा स्मार्टफोन लाँच करण्याची तारीख जाहीर केली आहे.सदर इव्हेंटला “पिक्सेल फॉल लॉन्च” असे म्हटले आहे आणि लाँच इव्हेंट रात्री 10:30 सुरु होइल. कंपनी दोन डिवाइस लॉन्च करेल, ज्यात स्टँडर्ड पिक्सेल 6 आणि त्याचे प्रो व्हर्जन उपलब्ध होईल.

गूगल, पिक्सेल 6 तसेच पिक्सेल 6 प्रो चे फ्लॅगशिप फोन म्हणून अनावरण करण्यासाठी व्हर्च्युअल लाँच होस्ट करत आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला फोनबद्दल काही तपशील जाहीर करण्यात आले असले तरी लॉन्च दरम्यान अधिक माहितीची अपेक्षा केली जाऊ शकते.

लाँचसाठी पिक्सेल फॉल लॉन्च इव्हेंट वेबपेज देखील तयार केले गेले आहे, जे पिक्सेल 6 सीरिजचा कार्यक्रम दाखवेल. इव्हेंट लाईव्ह पाहण्यासाठी पिक्सेलचे चाहते कंपनीच्या गूगल इव्हेंट पेजवर ट्यून करू शकतात.

कंपनीने याची पुष्टी केली आहे की, पिक्सेल 6 फोन हे गूगलचे स्वतःचे टेन्सर चिप पॅक करणारे पहिले असतील, जे युजर्सना वेगवान आणि सुरक्षित अनुभव देतील.

गुगलने आधीच विविध टीझर्सद्वारे नवीन पिक्सेल 6 सीरिज दाखवली आहे. यात एक नवीन डिझाइन असेल, ज्यामध्ये गोलाकार नॉच डिस्प्ले आणि मागे होरिझोंटल कॅमेरा बार असेल. पिक्सेल 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 6.4-इंच FHD+ डिस्प्लेसह येऊ शकतो, तर प्रो व्हर्जन 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंच QHD+ पॅनल देऊ शकते. तसेच फोन 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध होतील.

पिक्सेल 6 प्रो ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह असू शकतो,ज्यामध्ये वाइड-एंगल सेन्सर, अल्ट्रा-वाइड-एंगल सेन्सर आणि 4 एक्स ऑप्टिकल झूमसह टेलीफोटो लेन्स समाविष्ट असू शकतात.

Comments are closed.